Andheri By Poll : ठाकरेंची ताकद वाढली; CPI पाठोपाठ संभाजी ब्रिगेडची मिळाली सोबत

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जवळ आली असल्याने आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नवीन समीकरण जुळताना पाहायला मिळत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बुधवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा जाहीर केला होता. त्यापाठोपाठ आता संभाजी ब्रिगेडनेही ऋतुजा रमेश लटके यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं.

ADVERTISEMENT

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी संघटनेचे अध्यक्ष मनोज आखरे यांचे पत्र ट्विट करुन याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली. या पत्रात म्हटलं आहे की, शिवसेना व संभाजी ब्रिगेड ही नव्याने झालेली युती आहे. या युतीचा धर्म जोपासत संभाजी ब्रिगेडच्यावतीने अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत शिवसेना पक्षाने दिलेले उमेदवार श्रीमती ऋतुजा रमेश लटके यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. तसेच संभाजी ब्रिगेड या निवडणुकीत आपल्या सोबत सक्रीय सहभाग नोंदवून पूर्ण ताकदीने उमेदवार निवडून आणण्यास कटिबध्य राहील.

हे वाचलं का?

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचाही पाठिंबा :

दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. काल दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. भाजप विरोधातल्या निवडणुकीला पाठिंबा दिला आहे. ठाकरे यांनीही भाजपविरोधात घेतलेल्या भूमिकेचं सीपीआयने कौतुक केलं.

ADVERTISEMENT

हिंदुत्वाची आणि पक्षाची मांडणी ठाकरेंकडून नव्या पद्धतीने सुरू आहे. त्यात ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. भाकपच्या या शिष्टमंडळात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, मुंबई सचिव मिलिंद रानडे, प्रकाश नार्वेकर, विजय दळवी, बबली राव यांचा समावेश होता. शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, आमदार रविंद्र वायकर, सुनील प्रभू, रमेश कोरेगांवकर उपस्थित होते.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT