Sandeep Deshpande : संदीप देशपांडे राज ठाकरेंच्या घराबाहेरुन का पळून गेले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेरुन पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढणारे मनसेचे नेते संदीप देशपांडे अखेर समोर आले आहेत. राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानसमोर पोलीस संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी आपल्या गाडीतून पळ काढला होता. तेव्हापासून त्यांचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत. ते अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही. असं असताना एका व्हीडिओच्या माध्यमातून ते आता समोर आले आहेत.

ADVERTISEMENT

मशिदीवरील भोंग्यांबाबत अल्टिमेटम दिल्यानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांकडून मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात येत आहे. तर काही जणांची धरपकड देखील सुरु आहे. असं असताना आज (4 मे) संदीप देशपांडे यांनी पोलिसांना हुलकावणी देऊन पळ काढला. त्यानंतर आता एका व्हीडिओच्या माध्यमातून त्यांनी आपली बाजू मांडली आहे.

पाहा व्हीडिओमध्ये संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले:

हे वाचलं का?

‘आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास मी, संतोष धुरी आम्ही राज ठाकरेंना भेटण्यासाठी गेलो होतो. तिथून बाहेर आल्यावर मीडियातील अनेक लोकं उभे होते. ज्यांना बाइट हवा होता. आम्ही त्यांना बाइट देत असताना शिवाजी पार्कचे पोलीस इन्स्पेक्टर कासार साहेब हे आले आणि मला खेचायला लागले. तेव्हा मी त्यांना विचारलं की, आपण मला ताब्यात घेताय का? तसं असेल तसं सांगा. मी तुमच्यासोबत यायला तयार आहे.’

‘ते म्हणाले.. नाही, नाही.. तुम्हाला ताब्यात घेत नाहीए. रस्त्यावर सगळी गर्दी होत आहे. असं त्यांनी मला सांगितलं. म्हणून आम्ही सरळ पुढे चालत फुटपाथवर आलो आणि मग तिथे येऊन बाइट दिला.’

ADVERTISEMENT

‘त्यानंतर पोलिसांनी मला पूर्ण घेराव घातला. मी त्यांना प्रयत्न प्रश्न विचारला. या सगळ्या गोष्टी रेकॉर्डिंगमध्ये आल्या आहेत. ती त्यांना पुन्हा विचारलं की, तुम्ही मला ताब्यात घेत आहात का?.. तेव्हा पण म्हणाले साईडला या.. साईडला या.. तिथून आम्ही निघालो. तिथे संतोष धुरी होते. तिथे आमची गाडी होती. अक्षरश: मीडियाचा लोंढा.. आम्हाला वन टू वन करायचा आहे यासाठी माझ्या मागे लागला होता. म्हणून आम्ही गाडीत बसलो. पण गाडीत बसल्यावर मला कासार साहेब खेचण्यासाठी पुढे आले.’

ADVERTISEMENT

‘संतोष धुरी बाजूला बसल्याने त्यांना मला खेचता आलं नाही आणि आमच्या ड्रायव्हरने गाडी पुढे नेली. हा पूर्ण घटनाक्रम आहे. जो झाला तो असा झाला.’

‘आता ती गाडी पुढे गेली त्यानंतर मी जेव्हा बातम्या बघत होतो. मीडियामधील फुटेज बघितलं तर आमची गाडी पुढे गेली आणि आमच्या गाडीच्या 15 ते 18 फूट मागे त्या महिला अधिकारी होत्या त्या पडल्या होत्या.’

‘आमची गाडी पुढे जातेय तर पाठिमागे असलेली व्यक्ती कशी काय पडू शकते गाडीच्या धक्क्याने? त्या ज्या महिला अधिकारी होत्या.. आपल्याला माहिती असेल की, पोलिसांचे प्रोटोकॉल.. महिला अधिकारी या पुरुष अधिकारी उपस्थितत असताना कधीही पुरुषांना पकडायला जात नाही. माझ्या बाजूला आधीच सात ते आठ पोलिसांचं कडं होतं. त्यामुळे महिला अधिकाऱ्यांनी मला पकडण्याचा प्रश्नच येत नाही.’

‘त्या महिला अधिकाऱ्यांना आमचा स्पर्श सुद्धा झाला नाही. हे आपण फुटेजमध्येही बघू शकता. असं असताना आम्ही महिला अधिकाऱ्याच्या अंगावार गाडी घातली किंवा आमच्या धक्क्याने त्या पडल्या अशाप्रकारचे आमच्यावर का होतायेत? बरं स्वत: पीआय कासार साहेब हे उपस्थित होते.’

‘आमची गाडी पुढे जातेय तर पाठिमागे असलेली व्यक्ती कशी काय पडू शकते गाडीच्या धक्क्याने? त्या ज्या महिला अधिकारी होत्या.. आपल्याला माहिती असेल की, पोलिसांचे प्रोटोकॉल.. महिला अधिकारी या पुरुष अधिकारी उपस्थितत असताना कधीही पुरुषांना पकडायला जात नाही. माझ्या बाजूला आधीच सात ते आठ पोलिसांचं कडं होतं. त्यामुळे महिला अधिकाऱ्यांनी मला पकडण्याचा प्रश्नच येत नाही.’

‘त्या महिला अधिकाऱ्यांना आमचा स्पर्श सुद्धा झाला नाही. हे आपण फुटेजमध्येही बघू शकता. असं असताना आम्ही महिला अधिकाऱ्याच्या अंगावार गाडी घातली किंवा आमच्या धक्क्याने त्या पडल्या अशाप्रकारचे आमच्यावर का होतायेत? बरं स्वत: पीआय कासार साहेब हे उपस्थित होते.’

‘माझा त्यांना प्रश्न आहे की, कासार साहेब तुमच्या हृदयावर हात ठेवून सांगा की, आमच्या धक्क्याने त्या महिला अधिकारी पडल्या? मी तुम्हाला तेव्हाही सांगितलेलं आणि आताही सांगतोय.. आम्ही प्रत्येक वेळेला तुम्हाला सहकार्य केलं आहे. ज्या-ज्या वेळेला आंदोलनं केली आहेत त्या-त्या वेळेला संदीप देशपांडे स्वत: पोलीस स्टेशनला हजर झाला आहे. पळून जायची आम्हाला गरज नाही, आम्ही कधी घाबरलो नाही.’

‘पण आज कोणतंही आंदोलन केलं नव्हतं. सकाळपासून कुठेही माझी उपस्थिती नव्हती. असं असताना तुम्ही मला जबरदस्तीने पकडत असाल तर आम्हाला याबाबत विचारण्याचा अधिकार नाही? महिला अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे. मला मान्य आहे तुमची नोकरी आहे, दबाव आहे.. पण ताई एकदा स्मरून सांगा देवाला.. आमचा किंवा गाडीचा स्पर्श तरी झाला का तुम्हाला?’

Loudspeaker Row : संदीप देशंपाडेंच्या अडचणी वाढल्या, गृह राज्यमंत्र्यांनी दिले आदेश

‘एकवेळ मी खोटं बोलेन, तुम्ही बोलाल.. पण राज ठाकरेंच्या घराबाहेर सीसीटीव्ही आहेत ते खोटं बोलणार नाहीत. तुम्ही आमच्या पाठी धावत होतात, पोलीस धावत होते. त्यावेळी पोलिसांचा तुम्हाला धक्का लागला हेही स्पष्ट दिसतं आहे. असं असताना तुम्हाला आमच्यावर गुन्हे टाकायचे असतील कारण आम्ही सरकारच्या विरोधात बोलत असू. तर टाका. आम्ही जेलला घाबरत नाही.’

‘अशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करणार असाल तर मग मी हे सहन करणार नाही. माझी पोलिसांना विनंती आहे की, माझी बायको घरी एकटी असते आणि माझा सहा वर्षांचा मुलगा असतो. ज्या काही पद्धतीने तुम्ही पोलीस पुरुष घरात घुसण्याचा प्रयत्न करता ते कृपया करु नका. माझी विनंती आहे.’

‘मी घरी नाहीए, कायदेशीर सल्ला घेतोय. या संदर्भात जो कायदेशीर सल्ला मिळेल तसं मी वागेन. किती दिवस ठेवणार आहात जेलमध्ये? 10, 15 दिवस 1 महिना.. मी त्या गोष्टीला घाबरत नाही. पण या पद्धतीने दबाव टाकत असाल तर ते मी सहन करणार नाही.’ असं म्हणत संदीप देशपांडे यांनी आपली बाजू मांडली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT