संजय राऊतांच्या जामिनावरील स्थगितीच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी
१०० दिवसांनंतर संजय राऊत यांना PMLA कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संजय राऊत हे तुरुंगाबाहेर आले आहेत. रात्री ११.३० च्या सुमारास ते भांडूप येथील त्यांच्या निवासस्थानीही पोहचले. मात्र संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीचा विरोध कायम आहे. संजय राऊत यांच्या जामिनाच्या निर्णयाविरोधात ईडीने हायकोर्टात अपील केलं आहे. दुसरीकडे PMLA कोर्टाने ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले […]
ADVERTISEMENT

१०० दिवसांनंतर संजय राऊत यांना PMLA कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संजय राऊत हे तुरुंगाबाहेर आले आहेत. रात्री ११.३० च्या सुमारास ते भांडूप येथील त्यांच्या निवासस्थानीही पोहचले. मात्र संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीचा विरोध कायम आहे. संजय राऊत यांच्या जामिनाच्या निर्णयाविरोधात ईडीने हायकोर्टात अपील केलं आहे. दुसरीकडे PMLA कोर्टाने ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले असून संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. तर हायकोर्टात ईडीने जी याचिका दाखल केली आहे त्यावर आज सुनावणी होणार आहे.
शिवसेनेचे फायरब्रांड नेते अशी संजय राऊत यांची ओळख
शिवसेनेचे फायरब्रांड नेते अशी संजय राऊत यांची ओळख आहे. संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र बुधवारी म्हणजेच ९ नोव्हेंबरला त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर न्यायालय परिसरात शिवसैनिकांचा जल्लोष पाहण्यास मिळाला. तसंच संध्याकाळी सातच्या सुमारास संजय राऊत यांची ऑर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक जमले होते. शिवसैनिकांसोबत जात संजय राऊत यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीचंही दर्शन त्यांनी घेतलं.
संजय राऊत हे जेव्हा त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी पोहचले त्यावेळीही त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिक होते. त्यांनी त्या ठिकाणी एक छोटेखानी भाषणही केलं. मला अटक करून खूप मोठी चूक केली गेली आहे असंही वक्तव्य संजय राऊत यांनी बुधवारी केलं.