Shivsena नेतृत्व कमजोर होतं का? पटोलेंचा राऊतांना सवाल

मुंबई तक

Shivsena | Sanjay Raut : मुंबई : ठाकरे सरकार पडून आता ८ महिने उलटले आहे. मात्र अद्यापही हे सरकार कोणामुळे पडलं यावरुन महाविकास आघाडीतच आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी हे सरकार पडण्यासाठी विधानसभेचे तत्कालिन अध्यक्ष आणि काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरलं होतं. त्यांनी राजीनामा दिला नसता तर भाजपने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Shivsena | Sanjay Raut :

मुंबई : ठाकरे सरकार पडून आता ८ महिने उलटले आहे. मात्र अद्यापही हे सरकार कोणामुळे पडलं यावरुन महाविकास आघाडीतच आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी हे सरकार पडण्यासाठी विधानसभेचे तत्कालिन अध्यक्ष आणि काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरलं होतं. त्यांनी राजीनामा दिला नसता तर भाजपने संधी साधली नसती, असं म्हणतं त्यांनी पटोलेंवर निशाणा साधला होता. दरम्यान, यावर आता पटोले यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. (Shivsena | Sanjay Raut slams nana patole on mahavikas aaghadi government nana patole reply)

काय म्हणाले नाना पटोले?

नाना पटोले म्हणाले, मी संजय राऊत यांना धन्यवाद देतो की ते मला एवढे शक्तिशाली समजतात, की मी राहिलो असतो तर खोक्याचं सरकार आलं नसतं. मी असतो तर महाविकास आघाडीचं सरकार पडलं नसतं, अशा प्रकारचं वक्तव्य करुन ते माझ्या शक्तीची जाणीव करुन देत आहेत. माझ्या शक्तीचा परिचय त्यांनी देशाला करुन दिला आहे. पण जे पक्षाचे कोणी त्या खुर्चीवर बसले होते, तो पक्ष कमजोर होता का, ते नेतृत्व कमी पडत होता का? असं संजय राऊत साहेबांचं म्हणणं आहे का? हा प्रश्न निर्माण होतो.

PM in Mumbai: मोदींचा महिनाभरात दुसरा मुंबई दौरा! कुणाला करणार लक्ष्य?

हे वाचलं का?

    follow whatsapp