राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर संजय राऊत म्हणतात…
राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज ठाकरे यांना जर अयोध्येला जावंसं वाटतं आहे तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यांच्या निर्णयाचं मी स्वागतच करतो. प्रत्येक माणसाची आपली श्रद्धा असते. काही जण […]
ADVERTISEMENT
राज ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज ठाकरे यांना जर अयोध्येला जावंसं वाटतं आहे तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यांच्या निर्णयाचं मी स्वागतच करतो. प्रत्येक माणसाची आपली श्रद्धा असते. काही जण तिरुपतीला जातात. काही जण इतर देवस्थानांना जातात. त्याप्रमाणेच आता राज ठाकरेंनी अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे झालेला लढा विचारात घेतला तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याने अयोध्येत जायला पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर अयोध्याच नव्हे तर तिथल्या सर्व देवस्थांनाना भेटी दिल्या पाहिजेत असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनावरही भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करणं गरजेचं आहे. तसंच जेव्हा ते चर्चा करतील तेव्हा शेतकऱ्यांच्या डोक्यावर काळ्या कृषी कायद्यांची टांगती तलवार नको. आधी मोदी सरकारने कायदे रद्द करावेत आणि त्यानंतर चर्चा करावी असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शेतकरी हा राजकारणी नाही, तो त्याच्या हक्कांसाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी लढतो आहे. हे शेतकरी कोणत्या प्रांताचे, धर्माचे किंवा जातीचे आहेत हे मुळीच महत्त्वाचं नाही. शेतकऱ्यांनी उभारलेला लढा हा राष्ट्रीय लढा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे असंही संजय राऊत यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT