Sanjay Raut : नाव तानाजी आणि कृत्य सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडेंचं, बंडखोर आमदारांवर टीकास्त्र
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. तानाजी सावंत यांच्यावर टीका करत असताना नाव तानाजी मात्र वागले सूर्याजी पिसाळांसारखं असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. दहीसर या ठिकाणी शिवसेनेतर्फे मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना उद्देशून टीका केली […]
ADVERTISEMENT

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. तानाजी सावंत यांच्यावर टीका करत असताना नाव तानाजी मात्र वागले सूर्याजी पिसाळांसारखं असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. दहीसर या ठिकाणी शिवसेनेतर्फे मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना उद्देशून टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
शिवसेना या चार अक्षरांनी आज आम्हाला मोठं केलं आहे. आज कुठेही जा बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे हे वाघ आहेत असं आपल्याला म्हटलं जातं ते फक्त शिवसेनेमुळेच. आम्हाला पाहिल्यानंतर याचा नादाला आपण लागायला नको म्हणून मोदी-शाहही रस्ता बदलात. हा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे त्याच्या नादाला लाग नका असा म्हणतात. भगवा झेंडा त्याच्या हातात आहे वेळ पडली तर तो झेंडा खिशात ठेवेल आणि दांडा बाहेर काढेल हे देखील यांना माहित आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले तानाजी सावंत यांच्यावर टीका करत म्हणाले तो लफंगा पळून गेलाय. नाव तानाजीचं आणि कृत्य सुर्याजी पिसाळ-खंडोजी खोपड्यांचं असं म्हणत तानाजी सावंतांवर त्यांनी टीका केली. शनिवारीच तानाजी सावंत यांच्याविरोधात शिवसैनिकांनी दुकानाच्या बोर्डवर खेकडा सावंत असं लिहित आंदोलन केलं होतं. त्यापाठोपाठ आता आज संजय राऊत यांनी ही टीका केली आहे.