माझी शिफारस नसल्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत शशिकांत शिंदेंचा टोला

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अंतर्गत कलह आणि बड्या नेत्यांचा झालेला पराभव यामुळे सातारा जिल्हा बँकेची निवडणूक राज्यात चांगलीच गाजली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे विद्यमान मंत्री शंभुराज देसाई यांना या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला. शशिकांत शिंदेंच्या पराभवात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शिवेंद्रराजेंना मात्र यानंतर नाराजीचा सामना करावा लागला आहे. अध्यक्षपदासाठी शरद पवारांची भेट घेतल्यानंतरही राष्ट्रवादी नेत्यांच्या नाराजीमुळे शिवेंद्रराजेंचं अध्यक्षपद हुकलं आहे.

ADVERTISEMENT

शरद पवारांनी अध्यक्षपदाची माळ आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील यांच्या गळ्यात टाकली आहे. यावर माझी शिफारस नसल्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष बनू शकले नाहीत असा टोला शशिकांत शिंदेंनी लगावला आहे.

सातारा जिल्हा बँक निवडणुक : कालपर्यंत शिवेंद्रराजेंची चर्चा, आज अध्यक्षपदाची माळ नितीन पाटलांच्या गळ्यात

हे वाचलं का?

जावळी मतदारसंघातून शशिकांत शिंदे अवघ्या एका मताच्या फरकाने पराभूत झाले. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते रांजणे यांनी शिंदेंचा पराभव केला, ज्यांना थेट मदत शिवेंद्रराजेंनी केली होती. या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आणि कार्यकर्ते नाराज होते, ज्याचा फटका शिवेंद्रराजेंना बसल्याचं बोललं जातंय.

सातारा जिल्हा बँक निवडणूक : रांजणे छोटे कार्यकर्ते, बोलवता धनी वेगळा – शशिकांत शिंदेंची टीका

ADVERTISEMENT

“माझ्या पराभवानंतर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. पवार साहेबांनी त्या भावना ओळखल्या आणि म्हणूनच नितीन पाटलांना अध्यक्ष केलं. मी निवडून आलो असतो तर शिवेंद्रराजेंची शिफारस मी पवार साहेबांकडे करु शकलो असतो. याआधी शिवेंद्रराजे जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा मीच त्यांची शिफारस केली होती. परंतू यावेळी माझाच पराभव झाल्यामुळे माझी शिफारस कमी पडल्यामुळे शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत”, असा टोला शशिकांत शिंदेंनी लगावला.

ADVERTISEMENT

यादरम्यान शिवेंद्रराजेंना अध्यक्ष करु नका असं मी कधीच सांगितलं नसल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर साताऱ्यात टिकवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. पक्षाने आदेश दिला तर मी जावळीत नक्कीच रान पेटवेन असं म्हणत शशिकांत शिंदेनी थेट शिवेंद्रराजेंना आव्हान दिलं आहे.

२५ मतदारांनी तुम्हाला का डावललं, स्वतःचा काहीच दोष नाही का? शिवेंद्रराजेंनी शिंदेंना सुनावलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT