महाबळेश्वरमधील निजामच्या संपत्तीवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ : जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई
सातारा (इम्तियाज मुजावर) : महाबळेश्वर येथील निझामांचा भाडेतत्वावरील 15 एकर 15 गुंठे भूखंड आणि त्यावरील वुडलाॅन हा अलिशान बंगला साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशाने सील करण्यात आला आहे. तहसिलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या पोलीस बंदोबस्ताच्या मदतीने ही धाडसी कारवाई करत मुख्य बंगला आणि आजूबाजूच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या. बाजार भावाप्रमाणे या मिळकतीची किंमत […]
ADVERTISEMENT

सातारा (इम्तियाज मुजावर) : महाबळेश्वर येथील निझामांचा भाडेतत्वावरील 15 एकर 15 गुंठे भूखंड आणि त्यावरील वुडलाॅन हा अलिशान बंगला साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशाने सील करण्यात आला आहे. तहसिलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या पोलीस बंदोबस्ताच्या मदतीने ही धाडसी कारवाई करत मुख्य बंगला आणि आजूबाजूच्या इमारती ताब्यात घेण्यात आल्या. बाजार भावाप्रमाणे या मिळकतीची किंमत 200 ते 250 कोटी रुपयांच्या घरात आहे.
यापूर्वी 1 डिसेंबरला ही मिळकत ताब्यात घेण्यासाठी आलेल्या 60 ते 70 लोकांच्या जमावामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता. याआधीही अनेक वेळा मिळकत ताब्यात घेण्यावरून 2 गडांमध्ये राडे झाले आहेत. ही बाब लक्षात घेवुन सातारचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी 2 डिसेंबरला तहसिलदार सुषमा चैधरी पाटील यांना वुडलाॅन ही मिळकत ताब्यात घेण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसिलदारांनी 2 डिसेंबरला मिळकत ताब्यात घेण्याची तयारी केली. मात्र पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने तहसिलदारांनी 3 तारखेला कारवाईचा निर्णय घेतला. तहसिलदारांच्या मागणीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनीही अतिरिक्त कुमक पाठविली, त्याचप्रमाणे मदतीसाठी वाईचे तहसिलदार रणजितसिंह भोसले यांनाही पाठविले.
सकाळी 10 वाजता तहसिलदार सुषमा चौधरी आणि त्यांची कुमक वुडलॉन बंगल्यावर दाखल झाली. येथील मुख्य बंगल्या शेजारीच्या स्टाफ क्वार्टरमध्ये अनेक वर्षे माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे आणि त्यांचे पती माजी नगरसेवक कुमार शिंदे राहत आहेत. त्यांना शासकीय कारवाईची माहिती देवून सर्व साहित्य बाहेर घेऊन बंगला सोडण्यास सांगितले. आदेशाप्रमाणे शिंदेंनीही संध्याकाळी 5 पर्यंत बंगला रिकामा केला.