सातारा : गर्भवती वनसंरक्षक महिलेला मारहाण, अवघ्या १२ तासांत माजी सरपंचाला अटक

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गावच्या हद्दीत वनविभागाच्या जागेत काम करणाऱ्या मजुरांना दुसऱ्या गावात कामासाठी नेल्याच्या रागातून साताऱ्याच्या पळसावडे गावातील माजी सरपंच रामचंद्र जानकरने गर्भवती वनसंरक्षक महिलेला मारहाण केल्याची घटना घडली होती. सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात तात्काळ कारवाई करत आरोपी माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

जानकर दाम्पत्याने वनसंरक्षक महिला सिंधू सानप व त्यांचे पती वनरक्षक सूर्याजी ठोंबरे यांना लाथाबुक्क्यानी मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याचं कळतंय.

‘मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले’ असं म्हणत वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वन रक्षक सानप यांना मारहाण केली आहे.

हे वाचलं का?

सिंधू सानप यांनी माध्यमांशी बोलताना माजी सरपंचावर गंभीर आरोप केले आहेत. ‘तीन महिन्यांपूर्वी आपण इथे हजर झाले. त्यांच्याकडून वारंवार पैशाची मागणी करण्यात आली. तसेच धमक्या देण्यात आल्या. मी त्यांना जुमानलं नाही. शासकीय कामाचे पैसे मी त्यांना लाटू देत नव्हते. दरम्यान, दोन तीन दिवसांपासून ट्रांझिस्ट लाईनचं काम सुरू होतं. दोन दिवसांपूर्वी त्यांनी धमकी दिली. मात्र, मी माझं काम सुरूच ठेवलं. त्यानंतर ट्रांझिस्ट लाईनच काम संपल्यानंतर परत येत असताना त्यांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर माझ्या पतीलाही चप्पलेनं मारहाण केली’, असं सिंधू सानप यांनी म्हटलं आहे.

राज्य महिला अयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गंभीर दखल घेत, घटनेचा निषेध व्यक्त करून पोलिसांना तपासाच्या सुचना केल्या होत्या. पोलिसांनी जानकरला शिरवळ येथून तर त्याची पत्नी प्रतिभाला सातार्‍यातून अटक करण्यात आली आहे

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT