मुंबईच्या गुंडगिरीला सातारी हिसका सोसणार नाही; शिवेंद्रसिंहराजेंचा शिंदेंना गर्भित इशारा
–इम्तियाज मुजावर, सातारा ‘हिशोब चुकते करण्याची भाषा शशिकांत शिंदे यांनी करू नये. मी तुमचे आव्हान स्वीकारले आहे. यापुढे दोन हात करण्याची तयारी ठेवा. तुमच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नका, मुंबईच्या गुंडगिरीला सातारी हिसका सोसणार नाही. यापुढे तुमची दहशत गुंडगिरी जावळी तालुका चालून देणार नाही. तुमच्या पराभवाला तुमचा जावळीतील अनावश्यक हस्तक्षेपच जबाबदार आहे’, असा घणाघात सातारा-जावळीचे […]
ADVERTISEMENT

–इम्तियाज मुजावर, सातारा
‘हिशोब चुकते करण्याची भाषा शशिकांत शिंदे यांनी करू नये. मी तुमचे आव्हान स्वीकारले आहे. यापुढे दोन हात करण्याची तयारी ठेवा. तुमच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नका, मुंबईच्या गुंडगिरीला सातारी हिसका सोसणार नाही. यापुढे तुमची दहशत गुंडगिरी जावळी तालुका चालून देणार नाही. तुमच्या पराभवाला तुमचा जावळीतील अनावश्यक हस्तक्षेपच जबाबदार आहे’, असा घणाघात सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. ते जावळी येथील सोनगावमध्ये बोलत होते.
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे हे विजयी झाले. त्यांचा सोनगाव येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सातारा येथे आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्या पराभवाला शिवेंद्रसिंहराजे भोसले जबाबदार असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जोरदार प्रत्युत्तर देत शशिकांत शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागलं.
जिल्हा बँक निवडणूक: मला हद्दपार करण्याचा प्रयत्न, व्याजासकट परतफेड करणार – आमदार शशिकांत शिंदे