Satish Kaushik यांचा संशयास्पद मृत्यू?; पोलिसांना नेमकं काय सापडलं?
Satish Kaushik Death Update : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले होते. गुरूवारी 9 मार्चला त्यांनी जगाचा निरोप घेतला. सूरूवातीला सतीश कौशिक यांचे निधन कार्डियक अरेस्टमुळे झाल्याची माहिती मिळाली होती.मात्र आता सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. सतीश कौशिक यांच्या फार्महाऊसवर काही […]
ADVERTISEMENT
Satish Kaushik Death Update : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले होते. गुरूवारी 9 मार्चला त्यांनी जगाचा निरोप घेतला. सूरूवातीला सतीश कौशिक यांचे निधन कार्डियक अरेस्टमुळे झाल्याची माहिती मिळाली होती.मात्र आता सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. सतीश कौशिक यांच्या फार्महाऊसवर काही संशयास्पद औषधे सापडली आहेत. त्यामुळे ही औषधे नेमकी कोणती आहेत? सतीश कौशिक नियमित घेणारी ही औषधे होती का ? याचा तपास आता पोलीस करत आहे. (satish kaushik farmhouse crime team visited where recover some medicine)
मुंबईत होळी साजरी केल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले होते. सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी दिल्लीतील त्यांच्या फार्महाऊसवर कुटूंबियांसोबत होळी साजरी केली होती. यानंतर रात्री अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते.ज्यानंतर त्यांना फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. निधनानंतर सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे पोस्टमार्टमही करण्यात आले होते.यामध्य़े सतीश यांच्या शरीरावर जखमेचे निषाण सापडले नव्हते, तसेच त्यांचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाल्याची माहिती मिळाली होती.
Satish Kaushik Death: सतीश कौशिकांसोबत शेवटच्या क्षणी काय-काय झालं?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
फार्महाऊवर सापडली औषधे
सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी निधनापुर्वी साऊथ वेस्ट दिल्लीतील फार्महाऊसवर होळी साजरी केली होती.याच फार्महाऊसवर आता दिल्ली पोलिसांच्या क्राईम टीमचा तपास सूरू आहे. या तपासात पोलिसांना काही औषेधे सापडली आहेत. या औषधांमध्ये शुगर आणि डायजीन या त्यांच्या नियमित गोळ्या सापडल्या होत्या. या व्यतिरिक्त देखील काही औषधे सापडली आहेत.या औषधांचा आता तपास केला जात आहे.
Satish Kaushik : फार्महाऊसवर सतीश कौशिक सोबत काय झालं? पोलिसांकडून चौकशी सुरू
ADVERTISEMENT
सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या बॉडीवर जखमेचे निषाण सापडले नाही आहेत.मात्र रक्त आणि हृदय तापसणीसाठी ठेवण्यात आले होते. एक आठवडा किंवा 15 दिवसाच्या आत पोलिसांना रक्त आणि हृदयाची रिपोर्ट मिळणार आहेत. ज्यामध्ये पोलिसांना सतीश कौशिक यांच्या मृ्त्यूचे कारण समजणार आहे. तसेच पोलिसांनी फार्महाऊसवरील गेस्ट लिस्टची देखील माहिती घेतली आहे. या दिशेने देखील तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान आता सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या फार्महाऊसवर सापडलेल्या औषधांमधून काय समोर येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच रक्त आणि हृदयाच्या रिपोर्टच्या अहवालाची पोलीस वाट पाहत आहेत. आता या सर्व तपासातून काही निष्कर्ष समोर येतो, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे
Kusha Kapila : प्रसिद्ध युट्यूबरच्या फोटोंचा दुरुपयोग, डेटींग अॅपवर फेक अकाऊंट
ADVERTISEMENT