Nagpur : एका पिंपळाच्या झाडासाठी एकवटले ‘नागपूरकर’; कारण…
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर नागपुरातील 208 वर्ष जुनं असलेलं पिंपळाचं झाड तोडू नये म्हणून सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून झाड वाचविण्याची सामाजिक संघटना विनंती करत आहेत. नागपुरातल्या सीताबर्डी भागात 208 वर्ष जुने पिंपळाचे झाड आहे. हे झाड तोडलं जावं म्हणून या जागेचे मालक आणि अर्जदार घनश्याम पुरोहित यांनी नागपूर महानगर पालिकेच्या उद्यान विभागाकडे […]
ADVERTISEMENT

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
नागपुरातील 208 वर्ष जुनं असलेलं पिंपळाचं झाड तोडू नये म्हणून सामाजिक संघटना एकवटल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून झाड वाचविण्याची सामाजिक संघटना विनंती करत आहेत. नागपुरातल्या सीताबर्डी भागात 208 वर्ष जुने पिंपळाचे झाड आहे. हे झाड तोडलं जावं म्हणून या जागेचे मालक आणि अर्जदार घनश्याम पुरोहित यांनी नागपूर महानगर पालिकेच्या उद्यान विभागाकडे अर्ज केला होता.
हे झाड दोनशे आठ वर्ष जुने असल्यामुळे तसेच कुठलीही मोठे झाड तोडायचे असल्यास वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात काढणे गरजेचे असते त्यानुसारच अर्जदार असलेल्या घनश्याम पुरोहित यांच्या झाड तोडण्याच्या अर्जानंतर नागपूर महानगर पालिकेच्या उद्यान विभागाने दिनांक 29 नोव्हेंबर 2021 रोजी एक जाहिरात प्रकाशित केली.