Video:स्कूल बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक, विद्यार्थ्यांने स्टेअरींग घेतलं हाती…
School bus driver heart Attack Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (video Viral) होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एका स्कुल बस (School Bus Driver) चालवणाऱ्या एका ड्रायव्हरला हार्ट अटॅक (Heart Attack) आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर […]
ADVERTISEMENT
School bus driver heart Attack Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (video Viral) होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एका स्कुल बस (School Bus Driver) चालवणाऱ्या एका ड्रायव्हरला हार्ट अटॅक (Heart Attack) आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये बसलेल्या एका मुलाने प्रसंगावधान दाखवत मोठा अपघात टाळला आहे. या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे आता कौतूक होतेय. (school bus driver heart attack in bus 13 year old boy control steering bus viral video)
ADVERTISEMENT
व्हिडिओत काय?
व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक स्कुल बस ड्रायव्हर (School Bus Driver) भरधाव बस चालवत होता. ही बस चालवताना अचानत त्याला हार्ट अॅटक (Heart Attack) आला. त्याला हार्ट अटॅक येताच त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि तो बेशुद्धच पडला. गाडीला मोठा अपघात होईल या भीतीपाई एका विद्यार्थ्यांने धाडस दाखवत बसच स्टेअऱींग हाताळंल. त्याने बसचे स्टेअरींग साभाळत मोठा टाळला.अपघात टळल्याच्या लक्षात येताच त्याने लगेचेच ड्रायव्हरचे जीव वाचवण्यासाठी त्याला CPR (सीपीआर) देण्याचा प्रयत्न केला. त्याने अनेक प्रयत्न केले, मात्र ड्रायव्हर काही शुद्धीवर आला नाही. त्यानंतर विद्यार्थी जाऊन आपल्या बसमधल्या स्थानी बसला होता. ही संपुर्ण घटना बसमध्ये लावलेल्या कॅमेरात कैद झाली आहे. हाच व्हि़डिओ आता व्हायरल होत आहे.
पिंपरी: भयंकर! झोपेतून उठवलं म्हणून मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या
School bus driver suffers heart attack and 13-year-old gets behind the wheel and saves all children’s lives pic.twitter.com/V0hoandvnt
— Great Videos (@Enezator) March 22, 2023
ट्विटर अकाऊंट @Enezator या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत बस ड्रायव्हरला हार्ट अॅटक येताच, एक 13 वर्षाचा विद्यार्थी भरकटलेल्या बसचे स्टेअरींग सांभाळतो आणि बसला योग्य स्थानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मात्र बस थांबत नसल्याने विद्यार्थी ड्रायव्हरच्या (Heart Attack) छातीवर दाबायला सुरूवात करतो. त्यावेळेस दुसरा विद्यार्थी येऊन बस थांबवतो. बस थांबल्यानंतर सर्व विद्यार्थी बाहेर पडतात.या घटनेत विद्यार्थ्यांने दाखवलेल्या धाडसाचे कौतूक होत आहे.
हे वाचलं का?
ट्विटरवरून शेअर झालेला व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत 7 मिलियन व्ह्यूज आले आहेत. या व्हि़डिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय. या व्हिडिओतील विद्यार्थ्यांने दाखवलेल्या धाडसाचे विद्यार्थी कौतूक करतायत.सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.
ADVERTISEMENT
42 वर्षीय महिलेचे मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, आता गाठलं पोलिस स्टेशन
दरम्यान ही घटना नेमकी कोणत्या राज्यात अथवा शहरात घडलीय याची माहिती मिळू शकली नाही आहे.मात्र व्हिडिओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. अशीच एक घटना गुजरातमध्ये देखील काही महिन्यापुर्वी घडली होती. या घटनेत देखील स्कुल बस ड्रायव्हरला हार्ट अटॅक (Heart Attack) आला होता.यावेळी बसमध्ये असलेल्या एका विद्यार्थीनीने स्टेअरींग सांभाळत मोठा अपघात टाळला होता. विद्यार्थीनीने स्टेअरींग साभाळली आणि बस एका खांब्याला आदळली, जर तिच बस भरधाव गेली असती तर अनेक गाड्यांचा अपघात झाला असता.मात्र विद्यार्थीनीच्या प्रसंगावधाने मोठा अपघात टळला होता.
ADVERTISEMENT
Nashik : चार महिन्यांच्या लेकीचा आईनेच कापला गळा, पोलीस तपासात कळलं कारण
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT