कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने वर्ध्यात शाळा, महाविद्यालयं बंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे वर्ध्यात शाळा, महाविद्यालयं बंद करण्यात आली आहेत. वैद्यकीय शिक्षण संस्था सुरू असणार आहेत. पुढील आदेशापर्यंत शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 वी ते 12 वीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कामकाज सुरू ठेवून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची मुभा जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ADVERTISEMENT

सध्याच्या घडीला महाराष्ट्रातल्या यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि वर्ध्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. यवतमाळ आणि अमरावती या ठिकाणी लॉकडाऊन तर इतर शहरांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचलं का?

जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी काय आदेश दिले आहेत?

17 फेब्रुवारीपासून वर्ध्यात जमावबंदीचं कलम 144 लागू करण्यात आलं आहे. ज्यानुसार पाच पेक्षा जास्त लोकांना एका ठिकाणी गर्दी करता येणार नाही. पुढचा आदेश येपर्यंत हे कलम लागू असणार आहे.

ADVERTISEMENT

संध्याकाळी 7 नंतर दुकानं बंद करण्यात येतील, औषधं आणि अत्यावश्यक सेवांच्या दुकानांना या वेळेतून सूट देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त लोकांना जमता येणार नाही. रॅली किंवा मोर्चे काढण्यावर पूर्णतः बंदी

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 500 रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावला नसल्यास 200 रुपये दंड

या प्रकारचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांन दिले आहेत. तसंच पुढील आदेश येईपर्यंत शाळा आणि महाविद्यालयं बंद राहतील असंही स्पष्ट केलं आहे.

वर्ध्यात 18 फेब्रुवारीला 681 चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 89 नमुने पॉझिटिव्ह आले. त्यादिवशी कोणताही मृत्यू झाला नाही तर 15 जण कोरोना मुक्त झाले. 18 तारेखपर्यंत कोरोना रूग्णांची वर्ध्यातली एकूण संख्या 11 हजार 5 इतकी होती त्यापैकी 680 सक्रिय रूग्ण आहेत तर एकूण 324 जणांचा मृत्यू झाला.

17 फेब्रुवारी

85 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, 14 जण कोरोनामुक्त

16 फेब्रुवारी

90 पॉझिटिव्ह, 1 मृत्यू आणि 16 जण कोरोनामुक्त

15 फेब्रुवारी

10 पॉझिटिव्ह, 2 मृत्यू आणि 14 जण कोरोना मुक्त

एकंदरीत ही आकडेवारी पाहिली तर लक्षात येतं की 16 तारखेपासून कोरोनाचे रूग्ण हे वाढले आहेत.

14 फेब्रुवारी

69 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह, 1 मृत्यू तर 14 जण कोरोना मुक्त

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT