Yasin Malik : यासीन मलिकला जन्मठेप; पतियाळा न्यायालयाने ठोठावली शिक्षा
बंदी असलेल्या जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासीन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात पतियाळा हाऊस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोन प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा आणि १० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. आज यासीन मलिकला शिक्षा सुनावली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयासह कश्मिरातील सुरक्षाही वाढवण्यात आली होती. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी यासीन मलिकला १९ मे […]
ADVERTISEMENT

बंदी असलेल्या जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासीन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात पतियाळा हाऊस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोन प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा आणि १० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
आज यासीन मलिकला शिक्षा सुनावली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयासह कश्मिरातील सुरक्षाही वाढवण्यात आली होती. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी यासीन मलिकला १९ मे रोजी दोषी ठरवलं होतं.
दहशतवादी कारवायांसाठी जगभरात जाळं तयार करून निधी गोळ्या केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने यासीन मलिकला शिक्षा ठोठावली आहे. दुपारी ३.३० वाजता यासीन मलिकला शिक्षा सुनावली जाणार होती. त्यानंतर हा निर्णय ४ वाजेपर्यंत टाळण्यात आला होता.
त्यानंतर सायंकाळी ६.१५ वाजता न्यायालयाने यासीन मलिकला शिक्षा सुनावली. दोन प्रकरणात आजन्म कारावास आणि १० लाख रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.