'...तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित करु', सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला इशारा
Supreme Court warns Maharashtra government : '...तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित करु', सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला इशारा
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'...तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित करु'
सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला इशारा
नवी दिल्ली : महाराष्ट्रात पुढील महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपर्यंतच ठेवावी, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास निवडणुकीची प्रक्रिया थांबवली जाईल, या निवडणुका स्थगित करण्यात येतील, असा कडक इशाराही न्यायालयाने राज्य सरकारला दिलाय.
न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुका 2022 मधील जे. के. बांठिया आयोगाचा अहवाल सादर होण्यापूर्वीची स्थिती लक्षात घेऊनच घेता येतील. बांठिया आयोगाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याचा सल्ला दिला होता. महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या विनंतीनंतर खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 नोव्हेंबर रोजी ठेवली. मात्र निवडणुकांत 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देऊ नये, हे पुन्हा एकदा राज्याला बजावले.
खंडपीठाचे म्हणणे आहे की, बांठिया आयोगाचा अहवाल सध्या न्यायालयीन प्रक्रियेत आहे आणि त्याआधीची परिस्थिती गृहीत धरूनच राज्याने निवडणुका पार पाडाव्यात.










