महिलेचा पाठलाग, धमक्या आणि बरंच काही... चक्क पोलीस प्रोटेक्शनमध्ये अर्ज, ‘त्या’ राजकीय राड्याची A टू Z स्टोरी
Angar Nagar Panchayat: सोलापूर जिल्ह्यातील अनगर पंचायत समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड झालेली असताना केवळ नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत अनेक विचित्र गोष्टी घडत आहेत. जाणून घ्या याविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

Angar Nagar Panchayat
विजय बाबर, सोलापूर: एका महिलेला नगराध्यक्ष पदाच्या निवडणूक अर्ज भरण्यासाठी थेट पहाटेच निवडणूक अधिकाऱ्यांचं कार्यालय गाठण्याची पहिलीच घटना महाराष्ट्रात घडली आहे.
खरं तर प्रचंड पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलेली ही महिला कुणी मंत्री नाहीत, ना कुणी अधिकारी. फक्त नगर पंचायतीला नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरायला आलेल्या एक उमेदवार आहेत. या महिलेचं नाव आहे उज्जवला थिटे.
पण त्यांना धास्ती आहे ती सोलापूर जिल्ह्यातील मोहोळमधील भाजप नेते राजन पाटील यांची.. मोहोळचं राजकारण ज्यांच्याभोवती फिरतं ते हेच राजन पाटील.
नेमकं प्रकरण काय?
नगर पंचायत निवडणुकीत पाटलांनी आपली ताकद लावून सगळे नगरसेवक चक्क बिनविरोध आणले. पण असं असलं तरी नगराध्यक्ष पदासाठी मात्र निवडणूक होणार आहे.










