सुप्रियाताई ‘सेल्फी विथ खड्डे’ मोहीम पुन्हा सुरू करायची का? मनसेचा राष्ट्रवादीला टोला
राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये पडलेले खड्डे हा सध्या ऐरणीवरचा विषय आहे. राज्यभरात खड्ड्यांचा विषय गाजतो आहे. अशात मनसेचे सरचिटणीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या सेल्फी विथ खड्डे या मोहिमेवरून त्यांना टोला लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करून सुप्रिया सुळे यांना त्यांच्या जुन्या मोहिमेची आठवण करून दिली आहे आणि त्यावरून खोचक टोलाही लगावला आहे. ताई काही जुन्या […]
ADVERTISEMENT
राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये पडलेले खड्डे हा सध्या ऐरणीवरचा विषय आहे. राज्यभरात खड्ड्यांचा विषय गाजतो आहे. अशात मनसेचे सरचिटणीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या सेल्फी विथ खड्डे या मोहिमेवरून त्यांना टोला लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विट करून सुप्रिया सुळे यांना त्यांच्या जुन्या मोहिमेची आठवण करून दिली आहे आणि त्यावरून खोचक टोलाही लगावला आहे.
ADVERTISEMENT
ताई काही जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?? pic.twitter.com/nwkjr6dX0d
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 30, 2021
राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सेल्फी विथ खड्डे ही मोहीम राबवली होती. रस्त्यांवरच्या खड्ड्यांचे फोटो आणि त्यासोबत सेल्फी काढत त्यांनी सरकारचा निषेध नोंदवला होता. आता महाविकास आघाडीचं सरकार आहे ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी आहे. त्यामुळे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी त्याच जुन्या मोहिमेची आठवण करून देत सुप्रिया सुळे यांचा खड्ड्यांसोबतचा सेल्फी ट्विट केला आहे आणि आपण पुन्हा ही मोहीम सुरू करायची का असा प्रश्न विचारला आहे. ताई जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का? असा उपरोधिक प्रश्नही विचारला आहे.
‘असं बिलकुल चालणार नाही!’ खड्डे पडलेल्या रस्त्यावरच एकनाथ शिंदेनी अधिकाऱ्यांची घेतली शाळा
हे वाचलं का?
रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवरून अनेकजण प्रवास करतात. अनेकांचे अपघात झाले आहेत काहींनी यामध्ये जीवही गमावला आहे. त्यामुळे खड्डे हा ऐरणीवरचा विषय आहे. अशात मनसेचे नेते अमित ठाकरे यांनीही यावरून सरकारवर टीका केली आहे. खड्ड्यांबाबत उच्च न्यायालयात खोटं बोलणाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा, वाया जाणारे इंधन, अपघात, प्रवाशांचे प्राण जाणं या घटना घडत असून याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.
शहराबाहेर स्वतंत्र पार्किंग लॉट ! ठाण्याची वाहतूक-कोंडी सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेचा मास्टरप्लान तयार
ADVERTISEMENT
ठाण्यातल्या खड्ड्यांवरून एकनाथ शिंदे भडकले
ADVERTISEMENT
ठाण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना संताप अनावर झाला. एकनाथ शिंदे यांनी रस्त्यांची पाहणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांचा वर्ग घेतला. ‘खड्ड्यामुळे आम्ही शिव्या खायच्या, याला काय अर्थ आहे. कोण कंत्राटदार आहे, ब्लॅकलिस्ट करा त्याला’, असं म्हणत एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.
ठाण्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळणी झाली असून, लोकांमधून संताप व्यक्त आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली असून, लोकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. ठाण्यातील रस्त्यांवरील खड्ड्याचा मुद्दा चर्चेच्या वर्तुळात आल्यानंतर आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली होती त्यानंतर ते चिडले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT