Satara : आमदार फुटण्याला संजय राऊत जबाबदार, उद्धव ठाकरेंनी दूर राहावं -देसाई

इम्तियाज मुजावर

Sanjay Raut Controversy : कोल्हापुरात विधिमंडळाबद्दल अपशब्द काढल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी साताऱ्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर संताप व्यक्त करताना अर्वाच्च शब्द वापरले. त्यांच्या या भाषेमुळे सध्या वादात सापडले असून, आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी राऊतांना लक्ष्य करताना उद्धव ठाकरेंना राजकीय सल्ला दिला आहे. शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना आव्हान देताना त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sanjay Raut Controversy : कोल्हापुरात विधिमंडळाबद्दल अपशब्द काढल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी साताऱ्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर संताप व्यक्त करताना अर्वाच्च शब्द वापरले. त्यांच्या या भाषेमुळे सध्या वादात सापडले असून, आता शिवसेनेच्या मंत्र्यांनी राऊतांना लक्ष्य करताना उद्धव ठाकरेंना राजकीय सल्ला दिला आहे.

शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना आव्हान देताना त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी आपण मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) आणि उपमुख्यमंत्र्यांची (देवेंद्र फडणवीस)भेट घेणार अशल्याचं सांगितलं.

उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलं. ‘आमच्यामुळे राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनाम द्यावा’, अशा शब्दात देसाईंनी राऊतांना डिवचलं.

‘हेम्या, तू शेण खायला…’, खासदार संजय जाधवांचं हेमंत पाटलांवर टीकास्त्र

हे वाचलं का?

    follow whatsapp