खातेवाटपावरुन शिंदे गटातील मंत्री नाराज?, शंभूराज देसाईंनी स्पष्टच सांगितलं

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: शिंदे मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षीत विस्तार पार पडला त्यानंतर खाते वाटप झाले. शिंदे गटात्या ९ आणि भाजपच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. शपथविधीनंतरच शिंदे गटातील नाराजी समोर आली होती. संजय शिरसाट यांनी ती बोलून दाखवली होती, नंतर त्यांनी सारवासारव केली. आता खातेवाटप झाल्यानंतरही शिंदे गटातील खदखद बाहेर येत आहे. यावर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

खातेवाटपावरुन शंभूराज देसाई काय म्हणाले?

आमच्या ९ पैकी कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. जाणिवपूर्वक वावड्या उठवल्या जात आहेत. आम्ही पहिल्याच दिवशी आमचे पूर्ण अधीकार एकनाथ शिंदे यांना दिले होते. आम्ही तसा ठराव देखील केला. त्यामुळे कोणीतरी अशा वावड्या उठवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये असे शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

आमच्यामध्ये दूही निर्माण करण्याचा प्रयत्न- शंभूराज देसाई

आज सामानातून बंडखोरांवरती पुन्हा एकदा टीकास्त्र डागण्यात आले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शंभूराज म्हणाले ”मागील 2 महिन्यांपासून सामनातून काय वक्तव्य येत आहेत हे महारष्ट्र पाहत आहे. आमच्यामध्ये दूही निर्माण करण्याचा प्रकार सुरु आहे. परंतु आमची एकी कोणी तोडू शकणार नाही.” वंदे मातरम् बाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असेही देसाई म्हणाले.

हे वाचलं का?

”नाक मुठीत धरूनच ‘त्या’ 50 जणांना फडणवीसांकडे जावे”, सामनातून बंडखोरांवर टीकास्त्र

प्रकाश सुर्वे यांचं वक्तव्य अँक्शनला रिअँक्शन- शंभूराज देसाई

बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या चिथावणीखोर भाषणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ”प्रकाश सुर्वे यांचं वक्तव्य म्हणजे अँक्शनला रिअँक्शन आहे. कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांवर कोणीतरी दादागिरी केली असेल त्यामुळे ते तसं बोलले असतील. सत्ता डोक्यात जाणारे आम्ही नाही. ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे यामधे काही आक्रमक आहेत आणि काही शांत आहेत” असे शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

विनायक मेटे प्रकरणाची चौकशी सर्व बाजूने केली जाईल. घटनास्थळाची पाहणी वेगवेगळ्या टीमन केली आहे. चालकाची देखील चौकशी सुरू आहे. जोपर्यंत यंत्रणांचा निष्कर्ष निघत नाही तोपर्यंत त्यावर बोलणं योग्य नाही असे मत विनायक मेटेंच्या अपघाताच्या चौकशीवरती शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT