मोठी बातमी.. शरद पवारांनी अचानक घेतली PM मोदींची भेट, बंद दाराआड काय झाली चर्चा?
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (6 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांची राजधानी दिल्लीत अचानक भेट घेतली. बंद दाराआड झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ 20 ते 25 मिनटे चर्चा झाली. पण या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. राज्यात सध्या ईडीच्या अनेक कारवाई सुरु […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (6 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांची राजधानी दिल्लीत अचानक भेट घेतली. बंद दाराआड झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळजवळ 20 ते 25 मिनटे चर्चा झाली. पण या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
राज्यात सध्या ईडीच्या अनेक कारवाई सुरु आहेत. ज्यामध्ये महाविकास आघाडीचे अनेक नेत्यांवर ही कारवाई सुरु आहे. त्यातच काल (5 एप्रिल) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अलिबाग आणि मुंबईतील मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या सगळ्या घडामोडींवर शरद पवार यांची नरेंद्र मोदींशी काही चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी मारल्या जात आहेत. महाविकास आघाडीकडून या सगळ्याबाबत भाजपवर निशाणा साधला जात आहे. अशावेळी आता मोदी आणि पवार यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत स्वत: शरद पवार यांनी मुंबई Tak सोबत बोलताना माहिती दिली आहे.
पंतप्रधान मोदींशी ‘या’ विषयावर झाली चर्चा