शरद पवारांनी मंदिरात जाऊन का घेतलं नाही दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आज पुण्यात होते. या ठिकाणी गेल्यानंतर ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर भागात गेले होते. गणपती मंदिराच्या जवळ जाऊनही शरद पवार यांनी गणपतीचं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं नाही. त्यांनी बाहेरून बाप्पाला हात जोडले त्यानंतर त्या ठिकाणी ते थांबले नाहीत निघून गेले. आता शरद पवार यांनी असं का केलं? अशी चर्चा सुरू झाली आहे.

ADVERTISEMENT

‘शरद पवार नास्तिक आहेत त्यामुळेच ते….’ राज ठाकरेंचा निशाणा

दर्शन न घेण्याबद्दल काय म्हणाले शरद पवार?

हे वाचलं का?

आज नॉनव्हेज जेवण घेतल्याने आपण मंदिरात गेलो नाही, नॉनव्हेज खाल्ल्यानंतर मंदिरात जाणं योग्य वाटलं नाही म्हणून गेलो नाही असं याबाबत शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

गजानन काळे यांची शरद पवारांवर टीका

ADVERTISEMENT

राज ठाकरे हिंदू, हिंदुत्व, देव धर्म ह्यावर बोलले त्यानंतर सर्व महाविकास आघाडीचे झाडून नेते मंदिरात जाताना दिसले. आज पवार साहेब देखील दगडू शेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. पण त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतलं. राज ठाकरेंनी नास्तिक म्हटल्यापासून त्यांचा आस्तिक होण्याचा प्रवास चांगला आहे. मात्र शरद पवारांनी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिर गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं असतं तर आणखी आनंद झाला असता. राज ठाकरेंचं वक्तव्य शरद पवारांनी खूपच गांभीर्याने मनावर घेतल्यचं दिसतं आहे असंही गजानन काळे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक आहेत अशी टीका राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात केली होती. ते देव वगैरे काहीही मानत नाहीत त्यामुळेच ते मंदिरात कधीही जात नाहीत, इतरांनी हे धोरण अवलंबावं असं त्यांना वाटत असतं या आशयाचा एक आरोप राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात केला होता. त्यानंतर बारामतीकरांनी राज ठाकरेंना उत्तर देत शरद पवारांचे बारामती येथील मारूती मंदिरातले फोटो पोस्ट केले होते. तसंच शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही हा आरोप खोडून काढला होता.

राज ठाकरे म्हणाले शरद पवार नास्तिक, बारामतीकर म्हणाले हा पाहा व्हीडिओ

आज शरद पवार हे जेव्हा दगडूशेठ गणपती मंदिरात गेले नाहीत तेव्हा पुन्हा एकदा अनेकांना राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याची आठवण झाली. तसंच शरद पवार मंदिराच्या गाभाऱ्यात का गेले नाहीत ? याचीही चर्चा सुरू झाली होती. अशात आपण नॉन व्हेज खाल्लं असल्याने मंदिरात जाणं आपल्याला पटलं नाही त्यामुळे गणपतीचं दर्शन बाहेरून घेतलं असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT