शरद पोंक्षे करणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांमधील एक नाव म्हणजे शरद पोंक्षे. अनेक मालिका, चित्रपट तसंच नाटकांनंतर आता शरद पोंक्षे वेब सिरीजमध्ये दिसणार आहेत. प्लॅनेट मराठीच्या एका नव्या वेब सिरीजमध्ये शरद झळकणार असून सिरीजच्या शूटींगचा शुभांरभही करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

शरद पोंक्षे यांच्या या वेबसिरीजचं नाव सध्या तरी गुलदस्त्यात आहे. तर या सिरीजमधील कलाकारांची नावं मात्र जाहीर करण्यात आली आहेत. शरद पोंक्षेसोबत या सिजीजमध्ये शिल्पा तुळसकर, तेजस बर्वे, पर्ण पेठे, उदय नेने अशी दमदार स्टारकास्ट असणार आहे. ही वेबसिरीज कौटुंबिक आणि विनोदी स्वरूपाची असणार आहे.

सहा भागांची ही वेबसिरीज एक कौटुंबिक कथा आहे. या वेबसिरीजच्या निमित्ताने शरद पोंक्षे डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत. ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा सिरीजमधील कलाकारांनी व्यक्त केली आहे. या वेबसिरीजचे दिग्दर्शन अमित कान्हेरे यांचं असून योगेश विनायक जोशी यांनी संवादलेखन केलंय. तर प्रतिक व्यास, अमित कान्हेरे यांनी सिरीजची निर्मिती केली आहे. रोहन-रोहन यांनी या वेबसिरिजला संगीत दिले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT