Kapil Sibbal यांच्या घरासमोर युथ काँग्रेसचा राडा, शशी थरूर म्हणाले हे लज्जास्पद
कपिल सिब्बल यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या युथ काँग्रेसला शशी थरूर यांनी खडे बोल सुनावले आहेत. कपिल सिब्बल यांच्या घरासमोर युथ काँग्रेसने राडा केला आहे. त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानासमोर युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसंच त्यांच्या कारचीही तोडफोड केली. यावरून शशी थरूर आणि मनिष तिवारी यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. जी हुजुरी करणार नाही असं […]
ADVERTISEMENT

कपिल सिब्बल यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या युथ काँग्रेसला शशी थरूर यांनी खडे बोल सुनावले आहेत. कपिल सिब्बल यांच्या घरासमोर युथ काँग्रेसने राडा केला आहे. त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानासमोर युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसंच त्यांच्या कारचीही तोडफोड केली. यावरून शशी थरूर आणि मनिष तिवारी यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.
जी हुजुरी करणार नाही असं म्हणाले होते कपिल सिब्बल
मध्य प्रदेश, राजस्थान आणि आता पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. पंजाबमध्ये झालेला नेतृत्व बदल आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी दिलेला राजीनामा यावरून काँग्रेसमध्ये घमासान सुरू असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्ष नेतृत्वाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला.काँग्रेसकडे अध्यक्ष नसणं, हे दुर्दैव आहे, असं सांगत त्यांनी काँग्रेस कार्यकारी समिती बैठक बोलवण्याच्या मुद्द्यावर भर दिला. सिब्बल म्हणाले होते की, ‘मी त्या काँग्रेस सदस्यांचा प्रतिनिधी म्हणून बोलत आहे, ज्यांनी मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये काँग्रेसच्या कार्यकारी समिती आणि पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीला अध्यक्ष निवडीबद्दल पत्र लिहिलं होतं आणि अजूनपर्यंत त्याची वाट बघत आहोत’, असं सांगत सिब्बल यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तसंच जी हुजुरी करणार नाही असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं.