शिबानी दांडेकरने सासरे जावेद अख्तर यांच्यासोबत केला डान्स, फोटो व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर या दोघांचाही विवाह सोहळा शनिवारी खंडाळा या ठिकाणी पार पडला. या लग्नाचे खास फोटो आता व्हायरल होत आहेत. अभिनेत्री शिबानी दांडेकर ही खास दिसत होतीच. तिने सासरे जावेद अख्तर यांच्यासोबत केलेला डान्स आता व्हायरल झाला आहे. या दोघांचा डान्स करतानाचा फोटोही व्हायरल झाला आहे.

फरहान आणि शिबानी यांचं लग्न झालं. ते चार वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नातला हा फोटो आता व्हायरल झाला आहे. या फोटोत शिबानी आणि जावेद अख्तर यांच्यात असलेलं वडील मुलीसारखं खास नातं दिसून येतं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

फरहान आणि शिबानीची ओळख एका रिअॅलिटी शो दरम्यान झाली होती. 2015 मध्ये ‘I Can Do That’ हा रिअॅलिटी शो टीव्हीवर सुरु होता. या शो मध्ये फरहान होस्ट होता तर शिबानी कंटेस्टंट होती. या शो दरम्यान त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर 2018 मध्ये दोघांनी आपल्या रिलेशीपवर शिक्कामोर्तब केला. सोशल मीडियावरही दोघांचे एकत्र फोटो शेअर करु लागले. फरहानचे हे दुसरे लग्न आहे. अधुना भबानीसोबत 16 वर्ष संसार केल्यानंतर दोघांनी 2017 मध्ये आपल्या वैवाहिक आयु्ष्याला पूर्णविराम दिला. त्यानंतर फरहानने मुव्ह ऑन करत शिबानीसोबत नाते जोडले.

ADVERTISEMENT

कोण आहे शिबानी दांडेकर?

ADVERTISEMENT

शिबानीचा जन्म 27 ऑगस्ट 1980 साली महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला. मराठी कुटूंबात जन्मलेल्या शिबानीने आपले जास्तीत जास्त बालपण ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेत घालवले. तिचे शालेय शिक्षण तिथेच पूर्ण झाले होते.

शिबानीच्या वडिलांचे नाव आहे शशीधर दांडेकर. तर आईचे नाव आहे सुलभा दांडेकर. बॉलिवूडमध्ये सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री अनुष्का आणि अपेक्षा दांडेकर या तिच्या बहिणी आहेत.

2001 मध्ये आपल्या करियरला दिशा देण्यासाठी शिबानी न्यूयॉर्कमध्ये शिफ्ट झाली. तिथे तिने अनेक अमेरिकन टेलिव्हिजन शो चे होस्टींग केले. त्यापैकी 3 महत्त्वाचे नॅशनल शो होते नमस्ते अमेरिका, V देशी आणि एशियन व्हरायटी शो. या तीन शोचे होस्टिंग तिने उत्तमरीत्या पार पाडले होते. एशियन व्हरायटी शो अंतर्गतच तिने ‘अॅन इव्हिनिंग विथ शाहरुख खान’ हा शो अटलांटिक सिटीमध्ये होस्ट केला होता.

अमेरिकेमधील हे 3 मोठे नॅशनल शो होस्ट केल्यानंतर तिने आणखी मोठमोठ्या कंपन्यांचे इव्हेंट देखील होस्ट केले होते. यामध्ये मॅक्सिम हॉट, हंड्रेड नाईक, रोल्स रॉइस, प्युमा, मर्सिडीज, टोयोटो, हॉर्लिक्स, एचएसबीसी, स्पाइस मोबाईल, जेबीएल, एमटीव्ही कोक स्टुडिओ, निव्हिया इत्यादी मोठमोठ्या कंपनीचे शो तिने होस्ट केले.

तर सोनी लॉन्च अंतर्गत घेण्यात आलेल्या मायकेल जॅक्सनला ट्रिब्यूट देणारा कार्यक्रम ‘धिस इज इट’ हा शो देखील शिबानीने होस्ट केला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT