MLC election : तांबेंना मदतीचा हात! ‘मविआ’तील आमदारानेच दिला पाठिंबा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

maharashtra legislative council election 2023 Latest update : विधान परिषद निवडणुकीसाठीचं महाविकास आघाडीची (Maha vikas aghadi) भूमिका अजूनही निश्चित झालेली नाही. मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीच्या बैठकांवर (MVA Meeting) बैठका सुरू आहेत. त्यामुळे सत्यजित तांबेंचं (satyajeet tambe) काय होणार? याची उत्सुकता सर्वांना आहे. दरम्यान, काँग्रेसनं समर्थन काढून घेतल्यामुळे एकाकी पडलेल्या तांबे पिता-पुत्राला आता निवडणुकीत (Election 2023) मदत करणारा पहिला मित्र भेटला आहे.

ADVERTISEMENT

नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसनं डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा संधी दिली. सुधीर तांबेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सत्यजित तांबेंही निवडणूक लढवणार अशी माहिती पुढे आली आणि गोंधळ सुरू झाला.

डॉ. सुधीर तांबेंनी काँग्रेसकडून अर्ज भरलाच नाही. सत्यजित तांबेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर आली, तर महाविकास आघाडीचा निवडणूक लढवण्याचा खेळ बिघडला. दुसरीकडे तांबे पिता-पुत्राच्या भूमिकेवर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आणि सत्यजित तांबेंच्या पाठिंशी नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे सत्यजित तांबे एकटे पडल्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता तांबेंना मदतीचा पहिला हात मिळाला आहे.

हे वाचलं का?

सत्यजित तांबेंना कपिल पाटलांनी दिला पाठिंबा

अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर सुधीर तांबे यांनी सत्यजित तांबे हे महाविकास आघाडीचेच उमेदवार असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर सत्यजित तांबेंनी सर्व पक्षियांनी पाठिंबा देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, काँग्रेसनं सुधीर तांबेंचं निलंबन केलं आणि सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं होतं. दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी अधिकृतपणे पाठिंबा मागितलेला नसल्याचं सांगत भाजपनं यापासून स्वतःला दूर करून घेतलं. त्यामुळे सत्यजित तांबे निवडणूक कशी जिंकणार अशी चर्चा रंगलीये.

सत्यजित तांबेंना आता आमदार कपिल पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. कपिल पाटील हे शिक्षक भारती संघटनेचे आमदार आहेत. सत्यजित तांबे, त्यांचे वडील सुधीर तांबे हे निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळे नेते आणि संघटनांच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. तांबे पिता पुत्रांनी कपिल पाटील यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर कपिल पाटील यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला. शिक्षक भारती संघटनेचं नेतृत्व कपिल पाटील करतात. महत्त्वाचं म्हणजे ही संघटना राज्यातील शिक्षकांचे प्रश्न मांडत असते. त्यामुळे या निवडणुकीत या संघटनेची भूमिका महत्त्वाची आहे.

ADVERTISEMENT

कपिल पाटील यांनी सत्यजित तांबे यांना दिलेला पाठिंबा महाविकास आघाडीला धक्काच असल्याचं म्हटलं जात आहे. कारण कपिल पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिलेला होता. आता सत्यजित तांबे यांनी काँग्रेसविरोधात भूमिका घेतलेली आहे. काँग्रेसनंही त्यांना पाठिंबा नसल्याचं म्हटलेलं आहे, अशात कपिल पाटलांनी मात्र त्यांना पाठिंबा दिलाय. म्हणजे महाविकास आघाडीच्या भूमिकेच्या वेगळी आणि विरोधी भूमिका एकप्रकारे कपिल पाटील यांनी घेतल्याची चर्चा होत आहे.

महाविकास आघाडीचं भिजत घोंगडं

नाशिक पदवीधर मतदारसंघ शिवसेनेकडे, तर नागपूर शिक्षक मतदारसंघ काँग्रेसकडं अशी भूमिका आता महाविकास आघाडीनं घेतली आहे. मात्र, अद्यापही यावरून गोंधळ कायम आहे. महाविकास आघाडीची बैठक बुधवारी (18 जानेवारी) पार पडली. त्यात अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर आज (19 जानेवारी) पुन्हा बैठक होणार आहे.

ADVERTISEMENT

काल (18 जानेवारी) झालेल्या बैठकीनंतर बोलताना काँग्रेसचे नेते अशोक चव्हाणांनी माहिती दिली होती. “आगामी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील जागेसंदर्भात चर्चा झाली. साकारात्मक चर्चा झाली. राष्ट्रवादीचे नेते मुंबईत नसल्याने त्यांच्याशी फोनवर संपर्क केला. उद्या (19 जानेवारी) राष्ट्रवादीच्या नेत्यांशी अंतिम चर्चा होईल. त्यानंतर अंतिम निर्णयाची घोषणा केली जाईल. उद्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या बंगल्यावर तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक होईल. त्यानंतर महाविकास आघाडीची भूमिका अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करू”, चव्हाण म्हणाले होते.

विधान परिषद निवडणूक 2023 : मविआतील गोंधळ आज संपणार?

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत आहे. दुसरीकडे उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. नाशिकमध्ये शिवसेनेनं शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला असला, तरी महाविकास आघाडीची अधिकृत भूमिका अजून समोर आलेली नाही. त्यामुळे शुभांगी पाटलांची नजर मविआच्या नेत्यांकडे लागली आहे. नागपूरमध्येही काँग्रेसमध्येच गोंधळ आहे. कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत, त्यामुळे या सगळ्यांवर आज तरी पडदा पडणार का? हे पाहावं लागेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT