Shilpa Shetty म्हणते आम्हाला मीडिया ट्रायलची गरज नाही, प्रसिद्ध केलं निवेदन

मुंबई तक

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म प्रकरणात अटक कऱण्यात आली आहे. राज कुंद्रामुळे सध्या शिल्पा शेट्टीही चर्चेत आली आहे. राज कुंद्राला जुलै महिन्यात अटक करण्यात आली. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही या प्रकरणी चौकशी झाली. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर या प्रकरणी शिल्पा शेट्टीबाबतही बरीच उलटसुलट टीका झाली. आता शिल्पा शेट्टीने एक प्रसिद्धीपत्रक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म प्रकरणात अटक कऱण्यात आली आहे. राज कुंद्रामुळे सध्या शिल्पा शेट्टीही चर्चेत आली आहे. राज कुंद्राला जुलै महिन्यात अटक करण्यात आली. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही या प्रकरणी चौकशी झाली. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर या प्रकरणी शिल्पा शेट्टीबाबतही बरीच उलटसुलट टीका झाली. आता शिल्पा शेट्टीने एक प्रसिद्धीपत्रक काढून आपलं म्हणणं मांडलं आहे.

काय म्हटलं आहे शिल्पा शेट्टीने?

होय गेले काही दिवस हे नक्कीच आव्हानात्मक नक्कीच होते. खूप अफवा पसरल्या आणि आरोपही झाले. माध्यमांनी आणि खासकरून माझ्या नसलेल्या हितचिंतकांनी अनेक टीका टिपण्ण्या केल्या. माझं गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगही झालं. मला एकटीलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही ट्रोल केलं गेलं, नावं ठेवली गेली. मात्र माझ मन मला हे सांगतं की कशाचीही तक्रार करायची नाही आणि कशाचंही स्पष्टीकरण देत बसायचं नाही. Never Complain Never Explain असं माझी फिलॉसॉफी मला सांगते.

मी या प्रकरणात असे करणे म्हणजेच व्यक्त होणे टाळत राहीन, कारण ते न्यायालयीन प्रकरण आहे, म्हणून कृपया माझ्या वतीने खोटे कोट देणे थांबवा.

हे वाचलं का?