Shiv Sena vs BJP: मुख्यमंत्र्यांसमोरच शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते ऐकमेकांना भिडले
सांगली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोरच भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले असल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री हे 2 ऑगस्ट रोजी सांगलीत पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यसाठी आले होते. मात्र याचवेळी हरभट रोडवर शिवेसना आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने-सामने आले. भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तसंच निवेदन फाडून हवेत उधळण्यात […]
ADVERTISEMENT

सांगली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोरच भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले असल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री हे 2 ऑगस्ट रोजी सांगलीत पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यसाठी आले होते. मात्र याचवेळी हरभट रोडवर शिवेसना आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने-सामने आले.
भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तसंच निवेदन फाडून हवेत उधळण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी असा आरोप केला आहे की मुख्यमंत्री निवदेन स्वीकारताच पुढे गेले. त्यामुळेच ही निवेदनं फाडून उधळण्यात आली.
भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ येथील वातावरण तणावाचं झालं होतं.
भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट