‘मोदीजी तुमच्याजवळही चिखलच होता आणि तोच..’, PM मोदींना कोणी सुनावलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Saamana Editorial Criticism on PM Modi. मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी लोकसभेत केलेल्या भाषणावरुन आता शिवसेनेने (UBT) आपलं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून (Saamana Editorial) जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी देखील यावेळी चिखलच फेकला असं म्हणत शिवसेनेने मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. (shiv sena criticizes pm modi modiji you also had mud and thats what you threw)

ADVERTISEMENT

‘तुमच्याजवळ गुलाल होता आणि तो तुम्ही उधळला अशी बढाई तुम्ही मारली खरी, परंतु तुमच्याजवळही चिखलच होता आणि तोच तुम्ही फेकला.’ अशी थेट टीका अग्रलेखातून पंतप्रधानांवर करण्यात आली आहे.

सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत आणि गुरुवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिले. म्हणजे भाषण ठोकले. लोकसभेत बोलताना जसा त्यांनी अदानीचा ‘अ’देखील उच्चारला नाही तसेच त्यांनी राज्यसभेतही केले.

हे वाचलं का?

  • काँग्रेस पक्ष, गांधी-नेहरू घराणे, आधीच्या काँग्रेस सरकारांवरील टीका याभोवतीच त्यांचे भाषण फिरत राहिले. एके ठिकाणी ‘चिखल’ आणि ‘कमळ’ यांचा त्यांनी उल्लेख केला. ‘किचड उनके पास था, मेरे पास गुलाल! जो भी जिसके पास था, उसने दिया उछाल,’ असे पंतप्रधानांनी मोठय़ा शायराना अंदाजामध्ये सांगितले. ‘तुम्ही तेवढा जास्त चिखल उडवाल, तेवढे कमळ अधिक फुलेल,’ असेही ते म्हणाले. त्यावरून सत्ताधारी खासदारांनी बाके वाजवली.

  • पंतप्रधान मोदींची लोकसभेत तुफान फटकेबाजी, भाषण जसंच्या तसं!

    ADVERTISEMENT

    • देशभरातील भक्तमंडळीही ‘वाह! मोदी’ म्हणून खुश झाली असतील, पण या ‘यमका’पलीकडील ‘गमका’चे काय? चिखल आणि कमळ हे यमक जुळवायला, बोलायला, टाळय़ा मिळवायला ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या भाषणात गांधी-नेहरू घराणे, काँग्रेस पक्ष आणि आधीची काँग्रेसी सरकारे यांच्याविषयी जे बोललात ते काय होते? तुमच्याजवळ गुलाल होता आणि तो तुम्ही उधळला अशी बढाई तुम्ही मारली खरी, परंतु तुमच्याजवळही चिखलच होता आणि तोच तुम्ही फेकला.

    ADVERTISEMENT

  • काँग्रेस पक्षासंदर्भात परकीय विद्यापीठात झालेल्या कुठल्या तरी ‘संशोधना’चा तुम्ही केलेला उल्लेख हा कोणत्या ‘गुलाला’चा प्रकार होता? एकीकडे हिंदुस्थानची उभारणी अनेक पिढय़ांच्या श्रमातून आणि घामातून झाली असे सांगायचे आणि दुसरीकडे आधीच्या सरकारांनी

  • देशाचे वाटोळे केले, असा चिखल फेकायचा. पंडित नेहरू महान होते असेही म्हणायचे आणि नेहरू-गांधी घराण्याच्या नावाने बोटेही मोडायची. कलम 370 वरून त्यांना आरोपीच्या पिंजऱयात उभे करायचे. पुन्हा कलम 370 चे लाभार्थी कोण, हे मला सांगायला लावू नका, अशी धमकीही द्यायची. ही धमकी म्हणजे पंतप्रधानांनी उधळलेला ‘गुलाल’ होता, असे जर सत्ताधारी मंडळींना वाटत असेल तर प्रश्नच संपला.

  • Mood of the Nation: मोदी की गांधी, आज निवडणुका झाल्या तर कोणाची येईल सत्ता?

    • राज्यकर्ते आणि विरोधक यांच्यातील दावे-प्रतिदावे, डाव-प्रतिडाव, टीका-प्रत्युत्तर हे लोकशाही व्यवस्थेचेच भाग आहेत. त्यामुळे या शाब्दिक युद्धात गैर काहीच नाही. या आधीच्या काळातही सत्ताधारी-विरोधक यांच्यात टोकाची शब्दयुद्ध झालेलीच आहेत, परंतु त्यातही किमान चौकटीचे भान सगळेच पाळत असत. परस्परांवर आरोपांची ‘राळ’ उडविली गेली तरी वेळप्रसंगी एकमेकांवर कौतुकाचा ‘गुलाल’ही उधळला जाई.

    • आपल्यावर कठोर टीका करणाऱयांची भाषणे पंडित नेहरू सभागृहात येऊन ऐकत असत. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हेदेखील काँग्रेस आणि नेहरूंचे टीकाकारच होते. एकदा पं. नेहरू यांनी जनसंघावर टीका केली तेव्हा वाजपेयी नेहरूंना म्हणाले की, ‘तुम्ही शीर्षासन करता हे मला माहिती आहे. त्याबद्दल मला आक्षेपही नाही, परंतु कृपा करून माझ्या पक्षाची प्रतिमा उलटी पाहू नका.’

    • अटलजींच्या या उत्तरावर नेहरूदेखील खळाळून हसले होते. नेहरू यांची टीका आणि त्याला अटलजींचे उत्तर तोडीस तोडच होते, पण त्याला कुठेही ‘चिखलाचा वास’ नव्हता. अत्यंत टोकाची मतभिन्नता आणि विचारभिन्नता असली तरी चिखलाने माखलेली टीका क्वचितच होत असे. आता काय चित्र आहे? मागील सात-आठ वर्षांत तर राजकीय विरोधक म्हणजे शत्रू, सरकारचे टीकाकार म्हणजे देशद्रोही असे एक ‘नरेटिव्ह’ तयार केले गेले आहे.

    • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज विरोधकांची टीका म्हणजे ‘चिखल’ वाटत आहे, पण मागील आठ वर्षांत त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने विरोधकांवर कोणता ‘गुलाल’ उधळला? फक्त चिखलफेकच केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून राहुल गांधी यांचा भाजप समर्थकांनी केलेला उपमर्द, हेटाळणी याला चिखल नाही तर काय म्हणायचे? गुरुवारच्या राज्यसभेतील भाषणातही पंतप्रधान मोदी यांनी ‘नेहरू जर महान होते, तर त्यांच्या वारसांना नेहरू आडनाव लावण्यात लाज कसली?’ अशी टीका केली. तो ‘गुलाल’ होता असे पंतप्रधान आणि त्यांच्या पक्षाला म्हणायचे आहे का?

    • अदानी प्रकरणावरील मौन हा तुम्हाला गुलाल वाटत असेल तर काय बोलायचे? केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राजकीय विरोधकांची जी मुस्कटदाबी मागील सहा-सात वर्षांत होत आहे, इतर पक्षांना संपविण्याचे जे राक्षसी उद्योग केले जात आहेत तो तुमच्या हातात चिखल असल्याचाच पुरावा आहे. आता तुमच्यावर चिखलफेक सुरू झाली म्हणून तुम्ही ‘चिखल’, ‘गुलाल’ आणि ‘कमळ’ हे यमक जुळवले. मात्र तुमचेही पाय ‘चिखला’चेच आहेत हे ‘गमक’ विसरू नका. तुम्ही विसरलात तरी जनता त्याची आठवण योग्यवेळी तुम्हाला करून देईलच!

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT