देवेंद्र फडणवीसांची भेट-शिंदे गटात जाणार?; शिवसेना आमदार राजन साळवींनी मांडली भूमिका
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या बाजूने असणाऱ्या नेत्यांनाही गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. त्यातच शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. राजन साळवी देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याची आणि शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली. त्यावर आता राजन साळवींनी सविस्तरपणे भूमिका मांडलीये. राजन साळवी यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय की, “काल […]
ADVERTISEMENT

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या बाजूने असणाऱ्या नेत्यांनाही गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. त्यातच शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. राजन साळवी देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याची आणि शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली. त्यावर आता राजन साळवींनी सविस्तरपणे भूमिका मांडलीये.
राजन साळवी यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हटलंय की, “काल सायंकाळपासून माध्यमांकडून मला असं समजलं की, मी (राजन साळवी) देवेंद्र फडणवीसांना भेटलो आणि शिंदे गटात सामील होणार, अशा बातम्या आल्या आहेत. गेल्या ४० वर्षांपासून मी शिवसेनेत काम करतोय. शिवसैनिक, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, शिवसेनेचा तीन वेळा आमदार आणि शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करतोय.”
मी पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरेंसोबत -राजन साळवी
“महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी झाल्यात, पण मी आधीच सांगितलंय की आमच्या निष्ठा बाळासाहेबांच्या चरणी आहेत. माझ्याही निष्ठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पायाशी आहेत. त्यामुळे मी पहिल्या दिवसांपासून उद्धव ठाकरेंसोबत आहे”, असं राजन साळवी यांनी स्पष्ट केलं.
“बातम्यांमधून असं कळलं की, मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो. मी शिंदे गटात जाणार आहे. त्यामुळे मी खुलासा करू इच्छितो की, मी मरेपर्यंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेंसोबत काम करत राहणार आहे.”










