संजय राठोडांच्या मुळावरच उद्धव ठाकरे घालणार घाव, शिवसेनेचा मोठा प्लॅन फुटला
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा भाग असलेल्या संजय राठोडांविरोधात ठाकरेंची मोठी खेळी समोर आलीये. ज्यांच्या पाठिंब्यावर राठोडांचं राजकीय बस्तान बसलं, तिथेच दमदार एंट्री करण्याची तयारी ठाकरेंकडून केलीय जातेय. राठोडांना बालेकिल्ल्यातच चारीमुंड्या चीत करण्याच्या या मास्टर प्लॅनने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलीये. हा डाव नेमका काय, त्यामुळे राठोडांची कोंडी कशी होऊ शकते, आणि सगळ्या खळबळीनंतर पोहरादेवीचे […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा भाग असलेल्या संजय राठोडांविरोधात ठाकरेंची मोठी खेळी समोर आलीये. ज्यांच्या पाठिंब्यावर राठोडांचं राजकीय बस्तान बसलं, तिथेच दमदार एंट्री करण्याची तयारी ठाकरेंकडून केलीय जातेय. राठोडांना बालेकिल्ल्यातच चारीमुंड्या चीत करण्याच्या या मास्टर प्लॅनने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलीये.
हा डाव नेमका काय, त्यामुळे राठोडांची कोंडी कशी होऊ शकते, आणि सगळ्या खळबळीनंतर पोहरादेवीचे महंत काय म्हणतात, त्यामुळे सगळ्या प्रकरणात कसा ट्विस्ट निर्माण केलाय, तेच आपण समजून घेऊयात…
बंजारा समाजातील तरुणी पूजा राठोडच्या संशयास्पद मृत्यूने संजय राठोड संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाले. या प्रकरणाने ठाकरे सरकारची मोठी नाचक्की झाली. शेवटी भाजप नेत्या चित्रा वाघांच्या वाढत्या दबावामुळे राठोडांना राजीनामा द्यावा लागला. नंतर शिवसेनेतल्या बंडात राठोडांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात उडी मारली. मंत्री झाले.
4 मुद्द्यात समजून घ्या, संजय राठोड कोण आहेत?
आता त्याच राठोडांना मतदारसंघातच घेरण्यासाठी शिवसेनेकडून फिल्डींग लावली जातेय. त्यासाठी थेट राठोडांच्या सत्तास्थानावर घाव घालण्याची रणनिती समोर आलीये.
उद्धव ठाकरे महाप्रबोधन यात्रेतून महाराष्ट्र पिंजून काढणार
उद्धव ठाकरे दसऱ्यानंतर महाराष्ट्रभर महाप्रबोधन यात्रा काढणार आहेत. याचदरम्यान बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडालाही भेट देणार आहेत. इथे ठाकरेंकडून मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार असल्याचं म्हटलं जातंय.उद्धव ठाकरे संजय राऊ
यवतमाळमध्ये गर्भपात झालेली ‘पूजा अरुण राठोड’ कोण?
उद्धव ठाकरे विरुद्ध संजय राठोड
पोहरादेवीच्या महंतांना बंजारा समाजात मोठं महत्त्व आहे. महंतांशी जवळीक साधून अनेकांनी स्वतःच राजकीय बस्तान बसवून घेण्याचा प्रयत्न केला. राठोडांचं मंत्रिपद गेलं होतं, तेव्हा त्यांना पुन्हा मंत्री बनवावं म्हणून महंतांच्या माध्यमातून ठाकरेंकडे लॉबिंग करण्यात आलं. आता यापैकीच 3 महंत शिवबंधन बांधून राठोडांना चेकमेट देण्याचा प्लॅन समोर आला आहे.
पाचपैकी तीन महंत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मातोश्रीवर शिवबंधन बांधून घेणार असल्याचं म्हटलं जातंय. तसंच मोठ्या संख्येनं बंजारा समाजबांधवही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं महंत सुनील महाराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
महंत बांधणार शिवबंधन
राठोडांना चेकमेट देणारा हा प्लॅन सोमवारी रात्री फुटला तसंच राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीये. दुसरीकडे इतरही महंतांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. महंत जितेंद्र महाराज यांनी हा सगळा प्लॅन फेटाळून लावला. शिवबंधन बांधणार ही अफवा असल्याचा दावा केला.
शिवसेनेतल्या फाटाफुटीनं आता पोहरादेवी गडावरील महंतांमधली दुफळी समोर आलीय. महंत सुनील महाराज हे नॉट रिचेबल झालेत. पण ठाकरेंचा प्लॅन राठोडांना रोखू शकतो का, हे बघावं लागेल.