कुठे मिळते हे अजब रसायन?; शिवसेनेचा भाजपला टोला
जलयुक्त शिवार योजना (jalyukt shivar) फायदेशिर ठरल्याची आणि फडणवीस सरकारला यातून क्लीन चीट मिळाल्याची चर्चा सध्या सुरू असून, यावर जलसंधारण विभागाने स्पष्ट खुलासा केला आहे. असं काही झालं नसल्याचं जलसंधारण विभागाने स्पष्ट केलं. या सगळ्या प्रकरणावरून शिवसेनेनं (Shiv sena) भाजपवर टोलेबाजी केली आहे. शिवसेनेनं अग्रलेखात काय म्हटलंय? ‘भारतीय जनता पक्ष (bjp) हे एक अजबच रसायन […]
ADVERTISEMENT

जलयुक्त शिवार योजना (jalyukt shivar) फायदेशिर ठरल्याची आणि फडणवीस सरकारला यातून क्लीन चीट मिळाल्याची चर्चा सध्या सुरू असून, यावर जलसंधारण विभागाने स्पष्ट खुलासा केला आहे. असं काही झालं नसल्याचं जलसंधारण विभागाने स्पष्ट केलं. या सगळ्या प्रकरणावरून शिवसेनेनं (Shiv sena) भाजपवर टोलेबाजी केली आहे.
शिवसेनेनं अग्रलेखात काय म्हटलंय?
‘भारतीय जनता पक्ष (bjp) हे एक अजबच रसायन आहे. हे लोक आपल्या राजकीय विरोधकांवर बेफाम आरोप करत सुटतात. हवा तसा चिखल उडवतात. तक्रारदारही तेच व फौजदारही तेच असतात. दुसऱ्यांना बाजू मांडण्याची ते संधीच देत नाहीत. त्याच वेळी स्वतःवर जे आरोप पुराव्यांसह होत आहेत त्याबाबत ते स्वतःच स्वतःला क्लीन चिट देत सुटले आहेत यास काय म्हणावे? जलयुक्त शिवार योजनेतील ‘भ्रष्ट’ व्यवहारास क्लीन चिट मिळाली असून फडणवीस सरकारचे याबाबत गंगास्नान झाल्याचा डंका भाजप गोटातून पिटला जात आहे.
‘प्रसिद्धी माध्यमांची दिशाभूल करून हे ‘क्लीन चिट’ प्रकरण रंगविण्यात आलं, पण शेवटी सरकारतर्फेच या कट-कारस्थानाचा बुरखा उडविण्यात आला. जलयुक्त शिवाराला कोणीही क्लीन चिट दिली नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. जलयुक्त शिवाराच्या सुमारे 71 टक्के कामांमध्ये आर्थिक आणि प्रशासकीय अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले असून ‘एसआयटी’च्या अहवालाप्रमाणे सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी एसआयटीच्या निकषाप्रमाणे चौकशी अहवाल सादर केलेले नाहीत. चौकशी संपलेली नसताना सरकारने जलयुक्त शिवार अभियानाला क्लीन चिट देण्याचा प्रश्न येतोच कोठे, असा तगडा खुलासा जलसंधारण विभागाने बुधवारी केला आहे.’










