Uddhav Thackeray : भाजप किती तोंडाचा नाग आहे? छत्रपती शिवरायांचा अपमान कसा खपवून घेता?
भाजप हा पक्ष किती तोंडाचा नाग आहे? छत्रपती शिवरायांचा अपमान कसा काय खपवून घेता? असे प्रश्न उपस्थित करत सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान झाल्यानंतर गुजरातच्या सुपुत्राचा अपमान झाला असं सांगता मग छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? असाही प्रश्न सामनातून विचारण्यात आला आहे. काय म्हटलं आहे सामनाच्या […]
ADVERTISEMENT
भाजप हा पक्ष किती तोंडाचा नाग आहे? छत्रपती शिवरायांचा अपमान कसा काय खपवून घेता? असे प्रश्न उपस्थित करत सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान झाल्यानंतर गुजरातच्या सुपुत्राचा अपमान झाला असं सांगता मग छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? असाही प्रश्न सामनातून विचारण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?
भारतीय जनता पक्ष हा नक्की किती तोंडी नाग आहे? यावर आता नव्यानं संशोध करायला हवं. एखाद्या विषयावर हवं तेव्हा वळवळायचं आणि फुत्कार सोडायचे. नको असेल तेव्हा बिळात घुसायचे. छत्रपती शिवाजी महराजांच्या अपमानाप्रश्नी भाजप नेमकं हेच करत आहे. छत्रपती शिवरायांचा अपमान राज्यपालांनी करूनही त्यांच्या धमन्या थंडच आहेत आणि ज्यांनी उसळून तलवार काढली आहे त्यांच्यावर हल्ले सुरू केले आहेत. महसूल मंत्री विखे पाटील यांनी आता राज्यपालांचा बचाव केला आहे. कोश्यारींविरोधात लोकभावना भडकवण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं. विखेंनी असं बोलणं हा महाराष्ट्राच्या लोकभावनेचा अपमान आहे.
उदयनराजे छत्रपती य़ांनी खवळून सांगितलं की..
सातारचे छत्रपती उदयनराजे यांनी खवळून सांगितलं की छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर राहतात हा निर्लज्जपणा आहे. यावर विखे पाटील वगैरे लोकांचं काय म्हणणं आहे? राज्यपालांविरोधात लोकभावना भडकललेल्या आहेत. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. पण दुःख हे आहे की महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री अपमानाचं समर्थन करत आहेत. आता आमच्या वाचकांसाठी अपमानाचं एक वेगळंच प्रकरण समोर आणतो.
हे वाचलं का?
मोदींचा अपमान हा अपमान मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचं काय?
गुजरात विधानसभा प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदींची तुलना शंभर तोंडांच्या रावणाशी करताच मोदी आणि त्यांच्या लोकांनी लगेच काँग्रेस आणि खर्गेंवर प्रतिहल्ले सुरू केले. मोदींना रावणाची उपमा देणं हा गुजरात आणि गुजरातच्या सुपुत्राचा अपमान असल्याचं जाहीर सभांमधून ढोल-नगारे वाजवून सांगण्यात येतं आहे. गुजराती जनतेने मोदींच्या अपमानाचा बदला घेतला पाहिजे असंही मोदी सांगू लागले. पंतप्रधानांचा अपमान करणं चूकच आहे.
मात्र मोदींना रावण म्हटल्यानंतर जर गुजरात आणि गुजराती अस्मितेचा अपमान होत असेल तर छत्रपतींचा अपमान करणं हा महाराष्ट्राचा अपमान नाही असं भाजपचं म्हणणं आहे. छत्रपतींच्या अपमानानंतर मराठी जनता भडकताच हा विरोधकांचा डाव आहे असं भाजप सांगत आहे. यावरूनच भाजपचं शिवरायांविषयीचं प्रेम हे ढोंग असल्याचंच सिद्ध होतं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT