Agniveer Yojana’…लष्कर कंत्राटी असेल तर मग कंत्राटी राज्यकर्ते का नकोत?’-उद्धव ठाकरे
लष्कर कंत्राटी असेल तर मग राज्यकर्ते कंत्राटी का नकोत? असा सवाल विचारत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत अग्नीवीर या योजनेवर टीका केली आहे. कंत्राटी सैनिक, कंत्राटी लष्कर हा प्रकार मोदी सरकारने आणल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्या योजनेवर टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी जे प्रश्न विचारले त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तरं […]
ADVERTISEMENT
लष्कर कंत्राटी असेल तर मग राज्यकर्ते कंत्राटी का नकोत? असा सवाल विचारत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत अग्नीवीर या योजनेवर टीका केली आहे. कंत्राटी सैनिक, कंत्राटी लष्कर हा प्रकार मोदी सरकारने आणल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्या योजनेवर टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी जे प्रश्न विचारले त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तरं दिली आहेत.
ADVERTISEMENT
‘…तर तुम्हाला ‘अग्निवीर’ होता येणार नाही’, लष्कराने दिला थेट इशारा
काय म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी अग्नीवीर योजनेबाबत?
अग्नीवीर या योजनेचा युवकांनीच केला आहे. युवक त्यासाठी रस्त्यावर उतरले होते. वीर तुम्ही त्यांना म्हणत आहात पण त्यांच्या डोक्यात अग्नी आहे हे सरकार विसरलं. आम्हाला जे काही देत आहात ते टेंपररी आहे. तसा रोजगार देणार असाल तर कसं होणार हा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. त्याकरता आंदोलनही केलं.
हे वाचलं का?
कंत्राटी सैनिक याबाबत तुम्हाला काय वाटतं हे विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की तसं करायचं असेल तर मग सगळीकडेच ही पद्धत आणा. राज्यकर्तेही कंत्राटीच ठेवा. सगळंच आपण एजन्सी नेमून देऊ आणि देऊ कामाला असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.
Agnipath Protest: १० राज्यांमध्ये आंदोलनाचा भडका, संतापलेल्या विद्यार्थ्यांनी पेटवल्या ट्रेन
ADVERTISEMENT
अग्निपथ योजना नेमकी काय आहे?
– भारतीय लष्करात १७.५ ते २३ वर्षे वयोगटातील तरूणांना अग्निवीर म्हणून नोकरी मिळणार आहे. चार वर्षांच्या कालावधीसह ज्यात त्यांच्या प्रशिक्षणही होणार आहे. त्यासह समाविष्ट केलं जाणार आहे.
ADVERTISEMENT
– चार वर्षात या सगळ्यांना सैन्याचं म्हणजेच लष्करी प्रशिक्षण दिलं जाणार आहे
– यानंतर तुकडीतल्या केवळ २५ टक्के तरूणांनाच सैन्यात भरती करून घेतलं जाईल
– पहिल्या वर्षी ४६ हजार युवकांची अग्निवीर म्हणून भरती केली जाणार आहे
– या अग्निवीरांना महिन्याला ३० ते ४० हजार रुपये वेतन मिळणार आहे. वेतनात दर वर्षी काहीअंशी वाढ होईल. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवा निधी अंतर्गत ११.७१ लाख रुपये मिळतील, जे करमुक्त असतील.
केंद्रीय यंत्रणांवरही उद्धव ठाकरेंचं भाष्य
देशातल्या केंद्रीय यंत्रणांबाबत न्यायलयांनीही मतं व्यक्त केली आहेत. काहीही आरोपांखाली अटक करायची त्यानंतर कारवाया करत राहायच्या. आत्ताच्य काळात घाणेरड्या प्रकाराने बदनामी सुरू आहे असंही मत उद्धव ठाकरेंनी मांडलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT