“आम्ही विचारांचे वारसदार” म्हणत झळकली एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं पोस्टर
२१ जूनला शिवसेनेत झालेला भूकंप हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप ठरला. एकनाथ शिंदे यांनी थेट पक्ष नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं.त्यांना साथ लाभली ती ४० आमदारांची. शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले होते. त्यातले ४० आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. तसंच १८ पैकी १२ खासदारही शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे थेट पक्षावरच […]
ADVERTISEMENT
२१ जूनला शिवसेनेत झालेला भूकंप हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप ठरला. एकनाथ शिंदे यांनी थेट पक्ष नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं.त्यांना साथ लाभली ती ४० आमदारांची. शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले होते. त्यातले ४० आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. तसंच १८ पैकी १२ खासदारही शिंदे गटासोबत आहेत.
ADVERTISEMENT
त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे थेट पक्षावरच दावा सांगत आहेत हेच आत्तापर्यंत वारंवार दिसलं आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने खरी शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे असं म्हटलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. अशात शिवसेना काबीज करण्यासाठी एकनाथ शिंदे हर तऱ्हेने प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावाही पार पडणार आहे त्या मेळाव्याचं पोस्टरही झळकलं आहे.
काय आहे एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं पोस्टर?
शिवसेनेचा दसरा मेळावा असं पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. तसंच हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार असंही म्हटलं आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. तसंच शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण आणि शिवसेनेचा वाघ हे देखील पोस्टरवर आहेत. तसंच एकनाथ शिंदे यांचाही फोटो आहे. आम्ही विचारांचे वारसदार असंही या पोस्टरवर म्हटलं गेलं आहे. ५ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता बीकेसी मैदान वांद्रे या ठिकाणी हा मेळावा होणार आहे.
हे वाचलं का?
दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचं शक्ती प्रदर्शन
दसरा मेळाव्यासाठी मैदानाचा वाद मिटल्यानंतर शिंदे गटाने बीकेसी मैदानावर जय्यत तयारी सुरु केली आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्याचाही शिंदे गटाचा मानस आहे. यासाठी राज्याच्या विविध भागांमधून कार्यकर्ते आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी चार चाकी गाड्यांचे बुकिंग केले जात आहे. याशिवाय एसटी बसेसचेही ग्रुप बुकिंग करण्यासाठी आमदार, पदाधिकारी सज्ज झाले आहेत. चार हजारांहून अधिक एसटी गाड्यांचे बुकिंग करण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे.
दसरा मेळावा ही शिवसेनेची सुरूवातीपासूनची परंपरा आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटलं की बाळासाहेब ठाकरेच समोर उभे राहतात. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे सातत्याने दसरा मेळावा घेत आहेत. मात्र यावर्षी शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेना काबीज करण्याच्या तयारीत आहेत.
ADVERTISEMENT
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे पक्ष वाढवण्यासाठी आणि नव्याने बांधणी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे, भाजप यांच्यावर तुटून पडणार हे दिसतं आहे. कारण शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा नुकताच मुंबईत पार पडला. त्यात उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात काय बोलू शकतील याची चुणूक दिसून आली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT