दीपाली सय्यद म्हणतात, ‘स्वयंघोषित हिंदूजननायक’ असं जाहीर करून ताम्रपट मिळत नाही
Deepali Sayed: स्वयंघोषित हिंदूजननायक असं जाहीर करून ताम्रपट मिळत नाही असं म्हणत अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. दीपाली सय्यद यांनी पुन्हा राज ठाकरेंवर टीका केली आहे. याआधीही त्यांनी अनेकदा टीका केली आहे. काय म्हटलं आहे दीपाली सय्यद यांनी? “अमित ठाकरे यांना नोटीस पाठवली नाही ही उद्धव […]
ADVERTISEMENT
Deepali Sayed: स्वयंघोषित हिंदूजननायक असं जाहीर करून ताम्रपट मिळत नाही असं म्हणत अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. दीपाली सय्यद यांनी पुन्हा राज ठाकरेंवर टीका केली आहे. याआधीही त्यांनी अनेकदा टीका केली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे दीपाली सय्यद यांनी?
“अमित ठाकरे यांना नोटीस पाठवली नाही ही उद्धव साहेबांची मेहरबानी राजसाहेबांनी विसरू नये , सहनशीलता ही निवडणुकीत दाखवायची असते. स्वयंघोषित हिंदूजननायक करून ताम्रपट मिळत नाही.” असंही त्यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
अमित ठाकरे यांना नोटीस पाठवली नाही हि उद्धव साहेबांची मेहरबानी राज साहेबांनी विसरू नये , सहनशीलता हि निवडणुकीत दाखवायची असते. स्वयंघोषित हिंदुजननायक करून ताम्रपट मिळत नाही.
— Deepali Sayed (@deepalisayed) May 13, 2022
११ मे रोजीही दीपाली सय्यद अमित ठाकरेंच्या विरोधात ट्विट केलं होतं
“तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको” असं ट्विट करत दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती.
ADVERTISEMENT
तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको @RajThackeray @mnsadhikrut @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) May 11, 2022
१० मे रोजी राज ठाकरेंनी एक पत्र लिहिलं होतं त्या पत्रात त्यांनी सहनशीलतेचा अंत पाहू नका असं म्हणत पत्र लिहिलं होतं. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही जन्माला आलेलं नसतं, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रातून इशाराच दिला. भोंग्याच्या वादामुळे चर्चेत आलेल्या राज ठाकरेंनी आपल्या तिन्ही सभांमध्ये उद्धव ठाकरेंवर तशी थेट टीका केली नव्हती. मात्र आता त्यांनी उद्धव ठाकरेंनाच इशारा दिला.
ADVERTISEMENT
१० मे च्या पत्रात काय म्हणाले होते राज ठाकरे?
आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडालय की, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीर राज्य सरकारने कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतर कार्यकर्त्यांनाही पोलीस असे काही शोधत आहेत जणू काही ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत. अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे देश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.
राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही.
या सगळ्या प्रकरणानंतर अमित ठाकरेंना नोटीस पाठवली नाही ही उद्धव ठाकरेंची मेहरबानी समजा असं म्हणत दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT