Sudhir Joshi: बाळासाहेब ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक सुधीर जोशींचं मुंबईत निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं आज (17 फेब्रुवारी) वृद्धपकाळाने निधन झालं. मागील महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यातून ते बरे होऊन घरीही परतले होते. मात्र, त्यानंतर इतर व्याधींमुळे त्रस्त होते. त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते. मात्र, आज दुपारी त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्यांचं वय 81 वर्ष होतं. त्यांच्या निधनाने शिवसेनेने एक सच्चा शिवसैनिक गमावल्याची भावना सध्या व्यक्त केली जात आहे.

ADVERTISEMENT

सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जायचे. शिवसेनेच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून ते बाळासाहेबांसोबत होते. त्यामुळे शिवसेनेत त्यांची अनेक महत्वाची भूमिका बजावल्या होत्या.

शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबत असलेले सुधीर जोशी 1972 साली मुंबईचे महापौर म्हणून विराजमान झाले. यानंतर पदवीधर मतदारसंघाचे आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं होतं. दरम्यान, युतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव बरंच चर्चेत होतं. पण अखेर शेवटच्या क्षणी मनोहर जोशी यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली होती. पण तरीही सुधीर जोशी यांच्यावर शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

हे वाचलं का?

…तर बिनधास्त शिवसेना सोडा; निवडणूक निकालावरून उद्धव ठाकरेंनी घेतला शिवसैनिकांचा वर्ग

खरं म्हणजे शिवसेना-भाजप सरकारमध्ये ते साधारण वर्षभर महसूल मंत्री होते. मात्र नंतर त्यांच्यावर शिक्षण मंत्रिपदाची जबाबदारी बाळासाहेबांनी सोपावली होती. यावेळी त्यांनी या खात्याचा कारभार देखील उत्तमरित्या सांभाळला होता.

ADVERTISEMENT

1995 साली शिवसेना सत्तेत आली तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी सुधीर जोशी यांचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं. बाळासाहेब देखील याच नावावर शिक्कामोर्तब करतील अशी सर्वांना आशा वाटत होती. कारण 1973 साली जेव्हा मुंबईच्या महापौर पदी सुधीर जोशी यांना विराजमान करण्यात आलं होतं त्यावरुन सर्वांचा असाच होरा होता की, सुधीर जोशी हेच मुख्यमंत्री होती. मात्र, अखेरच्या क्षणी मनोहर जोशींना यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यात आलं. तेव्हापासून सुधीर जोशी यांची पक्षात काहीशी पिछेहाटच झाली.

ADVERTISEMENT

मात्र, असं असलं तरीही सत्ता गेल्यानंतरही आणि अगदी उतारवयात देखील सुधीर जोशी हे शिवसेनेच्या अनेक मेळाव्यात आणि कार्यक्रमांमध्ये दिसून येत होते. ते शेवटच्या क्षणापर्यंत बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणूनच जगले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT