Shivsena नेत्या उर्मिला मातोंडकर Chiplun पूरग्रस्तांच्या भेटीला
शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज पूरग्रस्तांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. चिपळूणमध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे त्या पार्श्वभूमीवर उर्मिता मातोंडकर या चिपळूणला गेल्या होत्या. यावेळी त्यांनी जी परिस्थिती पाहिली त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्या म्हणाल्या सध्याची स्थिती पाहून कुणाचाही धीर सुटेल अशीच अवस्था झाली आहे. जे लोक वाचले […]
ADVERTISEMENT
शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज पूरग्रस्तांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. चिपळूणमध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे त्या पार्श्वभूमीवर उर्मिता मातोंडकर या चिपळूणला गेल्या होत्या. यावेळी त्यांनी जी परिस्थिती पाहिली त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्या म्हणाल्या सध्याची स्थिती पाहून कुणाचाही धीर सुटेल अशीच अवस्था झाली आहे. जे लोक वाचले आहेत त्यांना परमेश्वरानेच वाचवलं आहे. पुढची मदत त्यांना केली जाईल, त्यांचं पुनर्वसनही केलं जाई. मी नेता नाही, मात्र मी आश्वासन दिलं आहे. माझ्या परिने मी पूर्ण मदत करेन असं सांगत असताना उर्मिला मातोंडकर यांना अश्रू अनावर झाले.
ADVERTISEMENT
चिपळूणमधील महाप्रलयाची स्थिती मी टीव्हीवर पाहिली त्यावेळी माझे मन खूप दुःखी झालं. त्यावेळेला मी कोलकात्याला होते. त्याच वेळेला मी ठरवले आपण कोकणात मदत घेऊन जायचं. कोकणवासीयांना मदत करायची. कोकणातील चिपळूणची परिस्थिती खूप भीषण आहे. मात्र कोणी तरी पुढाकार घेऊन मदत करणे गरजेचे आहे, तीच मदत घेऊन मी आले, असं उर्मिला मातोंडकर यांनी चिपळूणमध्ये पोहोचल्यावर सांगितलं होतं.
हे वाचलं का?
चिपळूणमध्ये यावर्षी प्रचंड पाऊस झाला. सुमारे तीन ते चार दिवस सुरू असलेल्या पावसाने चिपळूणमध्ये दाणादाण उडवली. 24 जुलैला तर अशी परिस्थिती होती की 36 तास उलटूनही पुराचं पाणी ओसरलं नव्हतं. अनेक ठिकाणी पाच ते सहा फूट पाणी साठलं होतं. बरेच नागरिक हे पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर अडकून पडले होते. 25 जुलैपासून हळूहळू पाणी ओसरण्यास सुरूवात झाली. या भागात नुकसान हे मोठ्या प्रमाणात असल्याने येथील नागरिकांना त्यातून सावरण्यासाठी बराच काळ लागणार आहे.
शासनाकडून, स्वयंसेवी संस्थांकडून, कलाकारांकडून या ठिकाणी मदत पोहचवली जाते आहे. आज उर्मिला मातोंडकर यांनीही या भागाचा दौरा केला आणि मदत पोहचवली. या ठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती पाहून त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT