Vinayak Raut: ”महाराष्ट्रात काळू-बाळूचा तमाशा सुरू, शहाजीबापू म्हणजे सोंगाड्या”
नितीन शिंदे, प्रतिनिधी, सोलापूर सोलापूर: सांगोला येथे आज शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला. त्यामध्ये शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर तसेच स्थानिक आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे. सध्या महाराष्ट्रात काळू बाळू यांचा तमाशा सुरू आहे असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली […]
ADVERTISEMENT

नितीन शिंदे, प्रतिनिधी, सोलापूर
सोलापूर: सांगोला येथे आज शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला. त्यामध्ये शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर तसेच स्थानिक आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे. सध्या महाराष्ट्रात काळू बाळू यांचा तमाशा सुरू आहे असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
विनायक राऊत सांगोल्याच्या सभेमध्ये काय म्हणाले?
एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत असलेले सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदार संघात आज शिवसेनेचा निर्धार मेळावा झाला. त्या मेळाव्यात बोलताना खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळू बाळू तमाशाची, तर आमदार शहाजीबापू पाटील यांना सोंगाड्याची उपमा देत टीका केली आहे.
महाराष्ट्रात सध्या एक दाढीवाला आहे, एक बिनादाढीवाला. बिनदाढीवाल्याच्या मनात आलं की घेतला माईक. लगेच दाढीवाला पडला उताणा. राष्ट्रगीतासाठी कसं उभं राहावं, हे ज्यांना कळत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावा, हे आपलं दुर्दैवं अस म्हणत विनायक राऊत यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.