आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर; ऐच्छिक भेट की BMC ची रणनीती? : भाजपने साधला निशाणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आज (बुधवारी) एकदिवसीय बिहार दौऱ्यावर रवाना झाले. दुपारी दोन वाजता ते राष्ट्रीय जनता दलाचे नेते, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबत खासदार अनिल देसाई, खासदार प्रियंका चतुर्वेदी तसेच काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

ADVERTISEMENT

भेटीवर रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मी आणि उपमुख्यमंत्री एकाच वयाचे आहोत. ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. त्यामुळे क्लाईमेंट चेंज आणि पर्यावरण या विषयावर चर्चा करू. माझा काही अजेंडा नाही. आम्ही फोनवर बोलत होतो. आम्ही सत्तेत ते विरोधात असतानाही यापूर्वी अनेकवेळा बोलणं झालं होतं. आज प्रत्यक्ष भेटणार आहे.

भाजपने साधला निशाणा :

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावर भाजपकडून निशाणा साधण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांचा बिहार दौरा मुंबई महापालिकेसाठीची रणनीती आहे का? असा सवाल विचारला असता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आदित्य ठाकरे आता बिहारला गेले, उत्तर-प्रदेशला किंवा गुजरातला गेले तरीही मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षच जिंकले.

हे वाचलं का?

मागील निवडणुकीत भाजपला १४ लाख ५२ हजार मत होती. तर शिवसेनेला १४ लाख ४५ हजार मत होती. भाजपने ८२ जागा जिंकल्या तर शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या. आमची राज्यात युती असल्यामुळे आम्ही सत्तेसाठी प्रयत्न केले नाहीत. आता ते कुठेही गेले तरीही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि आशिष शेलार यांच्या नियोजनात आम्हीच ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार, असंही मुनगंटीवार म्हणाले.

ठाकरे गटाचे प्रत्युत्तर :

तर या मुद्द्यावर बोलताना विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजपला जम्मू-काश्मीरमधील पीडीपीसोबतच्या युतीची आठवण करुन दिली. दानवे म्हणाले, मेहबुबा मुफ्ती सोबत भेटणाऱ्या व बसणाऱ्यांनी शिवसेनेला राजकारण शिकवू नये. तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे या दोन्ही तरुण नेतृत्वांच्या भेटीच स्वागत केलं पाहिजे, असंही दानवे म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT