संतोष बांगरांकडून मध्यान्ह भोजनाची तपासणी; पुन्हा वाद टाळण्यासाठी CM शिंदेंना केली विनंती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हिंगोली : ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा मध्यान्ह भोजनावरून संताप व्यक्त केला. मध्यान्ह भोजन योजनेमार्फत कामगारांना देण्यात येणारं भोजन निकृष्ट दर्जाचे मिळत आहे. त्यामुळे माझ्या हातून पुन्हा गैरवर्तन घडू नये यासाठी महाराष्ट्रात कामगारांना देण्यात येणारी मध्यान्ह भोजन योजना तात्काळ बंद अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

ADVERTISEMENT

आमदार संतोष बांगर यांनी बुधवारी दुपारी मध्यान्ह भोजन घेऊन जाणाऱ्या गाडीला अडवून जेवणाची पाहणी केली. यावेळी डब्यात करपलेल्या पोळ्या, वारणात अळ्या आढळ्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कर्मचाऱ्याला आजचा मेन्यू विचारला असता उडवाउडवीची उत्तर दिली असल्याचही बांगर म्हटलं आहे.

आपण पाठीमागे जो व्यवस्थापकासोबत गैरव्यवहार केला होता, आज पुन्हा आपल्याला संताप आला आहे. त्यामुळे माझ्या हातून पुन्हा गैरवर्तन घडू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात कामगारांना देण्यात येणारी मध्यान्ह भोजन योजना तात्काळ बंद करावी. तसेच निकृष्ट दर्जाचे जेवण पुरवणाऱ्या कंपनीविरोधात कारवाई करून कामगारांच्या खात्यावर जेवणाचे पैसे द्यावे, अशी विनंतीही आमदार संतोष बांगर केली.

हे वाचलं का?

मागील काही दिवसांपूर्वी आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडिया आणि माध्यमांवर प्रदर्शित होताच बांगर यांना अनेकांनी ट्रोल करत जाब विचारला होता. यानंतर आज पुन्हा मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या कंपनी विरोधात बांगर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT