पुतीन, बायडन, किंग्ज चार्ल्स अन् उद्धव ठाकरे… राऊतांचं भाषण व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांचं एक भाषण सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होतं आहे. यात ते रशियाचे पंतप्रधान ब्लादमिर पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, इंग्लंडचे राजा चार्ल्स तिसरा यांच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चर्चा झाल्याचं ते सांगतं आहेत. वॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरवर सध्या या भाषणाची जोरदार चर्चा सुरु आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले संजय राऊत?

मंगळवारी नागपुरमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलतानाचं संजय राऊत यांचं हे भाषण आहे. यावेळी राऊत म्हणाले, रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि सध्याचे इंग्लडचे राजे प्रिन्स चार्ल्स यांच्यामध्ये सकाळी कॉन्फरन्स बैठक झाली. यात त्यांनी विचारलं उद्धव ठाकरे कोण आहेत? या माणसाची कमाल आहे. इतकी संकट आली तरी ते हार मानत नाही, यै कौन है आदमी?

“उद्या जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर उद्धव ठाकरेंचा सल्ला घ्यावा लागेल. म्हणून उद्धव ठाकरे यांना आपण भेटलं पाहिजे. ये कौन आदमी है? अरे जो बायडन यांनी विचारलं पुतीनला. अरे मोदीजी को पुछो ये कौन आदमी है? अभी तक मिलाया क्यु नही?

हे वाचलं का?

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीदेखील विचारतात उद्धव ठाकरे कोण आहेत? देशातील जी युद्धाची स्थिती असून सगळं जगात निराश आहे. अशावेळी उद्धव ठाकरे ज्यापद्धतीने लढत आहेत. कारण ही सुद्धा एक सेना, फौजच आहे ना. त्याचमुळे देशांचे प्रमुख लोक उद्धव ठाकरे कोण आहेत अशी विचारणा करत आहेत.

एकनाथ शिंदेंनाही टोला…

दरम्यान, यावेळी राऊत यांनी एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला. ते म्हणाले की, “क्लिंटनचा जमाना केव्हाच संपला हे कळलं पाहिजे”. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी आपल्या उठावाची दखल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनीही घेतली असल्याचं म्हणाले होते. एका भारतीय व्यक्तीच्या नातेवाईकाकडे क्लिंटन आपल्याबद्दल चौकशी करत होते असा दावा त्यांनी केला होता. यावर राऊत यांनी उत्तर दिलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT