मुंडे भगिनींवर नेमका कुणाचा राग आहे? विधान परिषदेवरून शिवसेनेचा भाजपला खोचक सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यसभा निवडणुकीच्या पाठोपाठ विधान परिषद निवडणूकही जवळ आली आहे. यासाठी भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेने उमेदवार जाहीर केले. पंकजा मुंडे यांना संधी दिली जाईल असं वाटलं होतं. मात्र तसं झालेलं नाही. त्यावरून विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. अशात शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात मुंडे भगिनींवर कुणाचा राग आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे याच नर्मदेच्या गोट्यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे असं म्हणत शिवसेनेने हा प्रश्न विचारला आहे.

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात?

हे वाचलं का?

महाराष्ट्रात भाजपच्या कृपेने राज्यसबेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान होतं आहे. राज्यसभेसाठी मतदान होतं आहे त्यानंतर लगेच विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध करता आल्या असत्या. कारण राजकीय पक्षांच्या आमदारांचे मतदान गुप्त पद्धतीचं नसतं. आपण कुणाला मतदान केलं हे प्रतोदांना दाखवून मतपत्रिका पेटीत टाकायची असते.

राजकीय पक्षांची मतं फुटण्याची शक्यता अजिबात नाही. खुल्या मतदानाचे नियम लागू झाल्यापासून महाराष्ट्रात २४ वर्षांत राज्यसभेसाठी निवडणूक झालेली नाही. जेव्हा गुप्त मतदान होतं तेव्हा क्रॉस व्होटिंगचे प्रकार घडले.

ADVERTISEMENT

अशात आता विधान परिषद निवडणुकीचीही चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषदेचं मतदान हे देखील राज्यसभेप्रमाणेच खुल्या पद्धतीने व्हावं ही मागणी जोर धरते आहे. शिवसेनेने विधान परिषदेसाठी सचिन अहिर तसंच आमशा पाडवी हे दोन नवे चेहरे दिले आहेत. भाजपने पुन्हा तेच नर्मदेचे गोटे समोर आणले. दरेकर, लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे वगैरे लोक. पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

पंकजा मुंडे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले पण यश आलं नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मुंडे भगिनींवर नक्की कुणाचा राग आहे? हा राग मुंडे भगिनींवर आहे की गोपीनाथ मुंडेंवर? याचा शोध घेणं आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या भाजपमधून मुंडे महाजन यांचे नामोनिशाण मिटवायचे या ईर्षेनेच मुंडे भगिनींचे राजकीय पतन सुरू झाले आहे. त्यामुळे भविष्यात काय घडेल याचा भरवसा नाही. राज्यसभेप्रमामेच विधान परिषदेची सोपी निवडणूक कठीण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. अहंकार आणि पैसा याच्या जोरावर असलेल्या अतिरेकी बुस्टरचं हे अजीर्ण आहे. महाराष्ट्रात काहीच सुरळीत घडू द्यायचं नाही यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत असाही आरोप सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT