ममतादीदींना बंगालची वाघीण म्हणत शिवसेनेने केली मोठी घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेने पश्चिम बंगालची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. याआधी १७ जानेवारीला खासदार संजय राऊत यांनीच बंगाल विधानसभा निवडणूक शिवसेना लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. ममतादीदी बंगालची वाघीण आहेत. त्यांच्याविरोधात सगळे एकवटले आहेत त्यामुळे आम्ही निवडणूक न लढवता ममतादीदींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे असंही संजय राऊत यांनी जाहीर केलं आहे.

ADVERTISEMENT

संजय राऊत यांनी काय म्हटलं आहे?

“शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार की नाही याविषयी अनेकांच्या मनात औत्सुक्य आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. सद्यस्थिती पाहिली तर ही निवडणूक दीदी विरूद्ध सगळे अशी होणार आहे. मनी, मसल आणि मीडिया ममतादीदींच्या विरोधात वापरले जात आहे. त्यामुळे बंगाल विधानसभा निवडणूक न लढवता शिवसेनेने ममतादीदींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ममतादीदींना आम्ही गर्जना करणारे यश चिंतितो, आमच्या मते त्याच खऱ्या बंगालची वाघीण आहेत.” या आशयाचं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

देशात आजही आणीबाणीसारखी स्थिती आहे-संजय राऊत

ममतादीदी या वाघीण आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक ही त्यांच्याविरोधात सगळे अशी होते आहे त्यामुळे शिवसेना तिथे निवडणूक लढवणार नाही. आम्ही ममतादीदींना पाठिंबा जाहीर केला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

“दरेकरांना पाहून कोरोना म्हटला असेल कुठे जॅकिटातून आत शिरू?”

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT