Shraddha Murder: DNA चाचणी, रक्त नमुन्यांची तपासणी आणि नार्को टेस्ट; ‘असं’ उलगडणार हत्येचं गूढ

मुंबई तक

Shraddha Walker Murder Mystery https: श्रद्धा वालकरच्या हत्येमुळे अवघा देश हादरला आहे. अशात आता अटक करण्यात आलेला आफताब पूनावाला खरं बोलतो आहे की खोटं? याचा निर्णय नार्को टेस्टमुळेच होऊ शकणार आहे. न्यायालयातून आफताबच्या नार्को चाचणीची संमती मिळाली आहे. त्यामुळे आता आफताबने केलेल्या सैतानी कृत्याशी संबंधित सगळ्या गोष्टी समोर येतील अशी अपेक्षा पोलिसांना आहे. या सगळ्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

Shraddha Walker Murder Mystery https: श्रद्धा वालकरच्या हत्येमुळे अवघा देश हादरला आहे. अशात आता अटक करण्यात आलेला आफताब पूनावाला खरं बोलतो आहे की खोटं? याचा निर्णय नार्को टेस्टमुळेच होऊ शकणार आहे. न्यायालयातून आफताबच्या नार्को चाचणीची संमती मिळाली आहे. त्यामुळे आता आफताबने केलेल्या सैतानी कृत्याशी संबंधित सगळ्या गोष्टी समोर येतील अशी अपेक्षा पोलिसांना आहे. या सगळ्या तपासात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एक आहे जंगलातून मिळालेल्या हाडांचा डिएनए रिपोर्ट आणि दुसरी गोष्ट नार्को टेस्ट.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचे पुरावे

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातले पुरावे आणि धागेदोरे पोलिसांसाठी महत्त्वाचे आहेत. दिल्ली पोलिसांनी जी नार्को चाचणीची मागणी केली होती ती न्यायालयाने मान्य केली आहे त्यामुळे दिल्ली पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांना आता ही अपेक्षा आहे की आफताबने केलेल्या सैतानी कृत्यांचा संपूर्ण कबुली जबाब त्यांना मिळू शकणार आहे. दिल्ली पोलिसांनी रोहिणी फॉरेन्सिक लॅबमध्ये नार्को चाचणीसाठी अर्ज केला आहे. तिथे आफताबच्या नार्को चाचणीची वेळ मागण्यासाठी हा अर्ज करण्यात आला आहे.

Shraddha Murder: एक होती श्रद्धा वालकर! प्रेमाच्या ३५ तुकड्यांची आक्रंदणारी कहाणी

आफताब विरोधात कठोर कारवाईसाठी..

आफताब पूनावालाने जे निर्घृण कृत्य केलं आहे त्याविरोधात सबळ पुरावे गोळा करून त्याच्यावर कठोर कारवाई करणं हे पोलिसांसाठी महत्त्वाचं आहे. पुरावे धुंडाळत असताना पोलीस दिल्लीसह पाच राज्यांमध्ये पोहचले आहेत. श्रद्धाच्या हत्येचा एक एक पुरावा शोधण्यासाठी पोलीस आता हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पोहचले आहेत. श्रद्धाचा मोबाइल आफताबने मुंबईत फेकल्याची बाब समोर आली होती. त्याचप्रमाणे या हत्येशी निगडीत काही महत्त्वाचे पुरावे हिमाचल प्रदेशात लपलेले असू शकतात असं पोलिसांना वाटतं आहे.

हे वाचलं का?