FD Interest rate : डिपॉझिटवर ‘इथे’ मिळणार 9.36 टक्के व्याज…

मुंबई तक

FD Offer: नव्या वर्षात गुंतवणूक करण्याचे संकल्प अनेकांनी केले असेल. अनेकजण सुरक्षित आणि चांगल्या परतावा देणारे पर्याय शोधत असतील. तुम्हालाही मुदत ठेवींवर (Fixed Deposite) चांगला परतावा मिळवायचा असेल, तर एक पर्याय आहे. श्रीराम फायनान्स लिमिटेड (Shriram Finance Limited) एफडी वरील व्याजदरांमध्ये वाढ केलीये. 1 जानेवारी 2023 पासून हे व्याजदर लागू करण्यात आलेत. भारतातील सर्वात मोठ्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

FD Offer: नव्या वर्षात गुंतवणूक करण्याचे संकल्प अनेकांनी केले असेल. अनेकजण सुरक्षित आणि चांगल्या परतावा देणारे पर्याय शोधत असतील. तुम्हालाही मुदत ठेवींवर (Fixed Deposite) चांगला परतावा मिळवायचा असेल, तर एक पर्याय आहे. श्रीराम फायनान्स लिमिटेड (Shriram Finance Limited) एफडी वरील व्याजदरांमध्ये वाढ केलीये. 1 जानेवारी 2023 पासून हे व्याजदर लागू करण्यात आलेत. भारतातील सर्वात मोठ्या रिटेल नॉन-बँकिंग वित्तीय कंपनींपैकी (NBFC) एक असलेल्या श्रीराम फायनान्सने मुदत ठेवींच्या व्याजदरात 5 ते 30 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. (Shriram Finance will offer 9.36 percent interest on fd)

ज्येष्ठ नागरिकांना होऊ शकतो मोठा फायदा

श्रीराम फायनान्स लिमिटेड ज्येष्ठ नागरिक पुरुषांनी एफडी केल्यास त्यावर 0.50% अतिरिक्त व्याज आणि ज्येष्ठ नागरिक महिलांना 0.10% अतिरिक्त व्याज देते. नियमित ठेवींवर, 60 महिन्यांच्या कालावधीसाठी 8.45 टक्के दराने व्याज देते. त्याच वेळी ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.50 टक्के व्याज मिळेल, ज्यामुळे त्यांच्यासाठी व्याजदर 8.95 टक्के होईल. त्याच वेळी ज्येष्ठ नागरिक महिलांनी केलेल्या ठेवींच्या रिन्यूअलवर जास्तीत जास्त 9.36% व्याज दिले जाणार आहे.

Shiv sena-bjp Alliance : भाजपलाच शिवसेनेसोबत युती नको होती; एकनाथ खडसेंनी सांगितलं कारण

श्रीराम फायनान्स लिमिटेड : एफडी व्याजदर

महिलांनी ठेवलेल्या ठेवींवर जास्तीत जास्त 8.55 टक्के परतावा मिळणार आहे. महिला ठेवीदार ज्या ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जास्तीत जास्त 9.09% व्याजदर दिला जाणार आहे. रिन्यूअलवर महिला ठेवीदारांना 60 महिन्यांच्या कालावधीसाठी जास्तीत जास्त 8.82% वार्षिक परतावा मिळतो. श्रीराम फायनान्स नियमित ठेवींवर आणि त्यांच्या रिन्यूअल्सवर 8.72% व्याजदर देत आहे.

श्रीराम फायनान्स : कोणत्या कालावधीसाठी किती व्याजदर, जाणून घ्या सविस्तर…

मुदत ठेवींवरील व्याज वाढीबरोबरच सर्व रिन्यूअल्सवर 0.25% अतिरिक्त व्याजाची ऑफर श्रीराम फायनान्सकडून दिली जात आहे. नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीने 12 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवरील व्याजदर 30 बेसिस पॉइंट्सने वाढवत 7% वरून 7.30% नेले आहेत. 18 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवरील व्याजदरात 20 बेसिस पॉइंटची वाढ करत व्याजदर 7.30% वरून 7.50% पर्यंत वाढवले आहेत.

त्याचप्रमाणे, 24 महिन्यांच्या कालावधीसाठीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सने वाढ केली असून, त्यामुळे व्याजदर 7.50 टक्क्यांवरून 7.75 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.

36 महिन्यांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात 10 बेसिस पॉईंट्सने वाढ केली आहे. व्याजदर 8.05 टक्क्यांवरून 8.15 टक्के केला आहे. 42 महिन्यांच्या कालावधीसाठी मुदत ठेवींचा व्याजदर 5 बेसिस पॉईंटने वाढला आहे, ज्यामुळे व्याजदर 8.15% वरून 8.20% वर पोहोचले आहेत. 48 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर आता 8.25% व्याजदर मिळेल, जो पूर्वी 8.20% होता. 60 महिन्यांत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर आता 8.45% दराने व्याज मिळेल, जे जुन्या दरापेक्षा १५ बेसिस पॉइंट्सने जास्त आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp