सिंधुदुर्ग: जिल्हा बँकेवर राणेंचंच वर्चस्व, भाजप 11 जागांवर विजयी, महाविकास आघाडीला धोबीपछाड
भारत केसरकर, सिंधुदुर्ग: अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे निकाल जाहीर झाले आहेक. यावेळी अत्यंत अनपेक्षित असे निकाल हाती आले आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आणि भाजपचे उमेदवार मनिष दळवी हे या निवडणुकीत अनपेक्षितरित्या विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे कणकवलीचे सतीश सावंत यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत […]
ADVERTISEMENT

भारत केसरकर, सिंधुदुर्ग: अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे निकाल जाहीर झाले आहेक. यावेळी अत्यंत अनपेक्षित असे निकाल हाती आले आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आणि भाजपचे उमेदवार मनिष दळवी हे या निवडणुकीत अनपेक्षितरित्या विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे कणकवलीचे सतीश सावंत यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत 19 पैकी 11 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त 8 जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे सध्या तरी या निवडणुकीत राणेंचंच वर्चस्व असल्याचं दिसून आलं आहे.
मात्र, या निवडणुकीत भाजपच्या राजन तेली यांना पराभवाचा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या सुशांत नाईक यांनी त्यांचा पराभव केला आहे.
संशयित आरोपी मनिष दळवी निवडणुकीत विजयी; विलास गावडेंना धक्का
वेंगुर्ला विकास संस्थेतून भाजप पुरस्कृत मनिष दळवी यांचा विजय झाला आहे. तर महाविकास आघाडीच्या विलास गावडे यांना धक्का बसला आहे. 23 पैकी 13 मते ही मनिष दळवी यांना पडली आहेत तर 8 मते विलास गावडे यांना मिळाली आहेत. वेंगुर्ला तालुक्यातून भाजपचा हा मोठा विजय म्हणावा लागेल.