दिरासोबत वहिनीचे अनैतिक संबंध, मोठ्या भावाने उचललं भयानक पाऊल
भरतपूर: राजस्थानमधील भरतपूर येथे अनैतिक संबंधांमुळे हत्येची एक घटना समोर आली आहे. जिथे मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली आहे. याबाबत अशी माहिती समोर येत आहे की, जेव्हा आरोपीला समजले की त्याचा लहान भावाचे त्याच्या वहिनीशी अनैतिक संबंध आहे, तेव्हा त्याने त्याने आपल्या मित्राच्या मदतीने आपल्याच लहान भावाच्या हत्येचा कट रचला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या […]
ADVERTISEMENT
भरतपूर: राजस्थानमधील भरतपूर येथे अनैतिक संबंधांमुळे हत्येची एक घटना समोर आली आहे. जिथे मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली आहे. याबाबत अशी माहिती समोर येत आहे की, जेव्हा आरोपीला समजले की त्याचा लहान भावाचे त्याच्या वहिनीशी अनैतिक संबंध आहे, तेव्हा त्याने त्याने आपल्या मित्राच्या मदतीने आपल्याच लहान भावाच्या हत्येचा कट रचला.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या लहान भावाला जंगलात नेले आणि चाकू आणि काठ्यांनी मारहाण करून त्याची हत्या केली. जेव्हा छोट्या भावावर अंत्यसंस्कार केले जात होते त्याचवेळी आरोपीने सर्वांसमोर कबूल केलं की, आपणच लहान भावाची हत्या केली. त्यानंतर ही बाब पोलिसांना कळवण्यात आली.
तपासाअंती पोलिसांनी हत्येतील सर्व आरोपींना अटक केली. यासोबतच आरोपींकडून हत्येत वापरण्यात आलेला चाकू आणि काठ्याही जप्त केली आहे.
हे वाचलं का?
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वसीम आणि त्याचा मृत भाऊ नसीमसह अन्य तीन भावांचे लग्न अलवर जिल्ह्यातील तिजारा तहसीलच्या मुसेपूर गावात राहणाऱ्या तीन बहिणींसोबत झाले होते. मात्र, मयत नसीमचे त्याच्या मोठ्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. त्यातूनच ही हत्या करण्यात आली. तिघे भाऊ ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
ADVERTISEMENT
मुंबई उपनगर : ‘तुझ्या आईसोबत अनैतिक संबंध आहेत’ म्हणणाऱ्या मित्राला संपवलं
ADVERTISEMENT
पोलिसांनी दोन्ही आरोपींना केली अटक
पोलीस अधीक्षक देवेंद्र कुमार विष्णोई यांनी सांगितले की, नसीम नावाच्या व्यक्तीचा मृतदेह जंगलात बेवारस अवस्थेत सापडला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली की, मयताचा मोठा भाऊ वसीम याने त्याचा मित्र रशीद याच्यासोबत मिळून लहान भाऊ नसीमची हत्या केली.
तपासात असं समोर आलं की, हत्या करण्यात आलेल्या नसीमचे आपल्या वहिनीशी अनैतिक संबंध होते आणि हीच गोष्ट जेव्हा वसीमला समजली तेव्हा त्याने आपल्या लहान भावाची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी वसीम आणि त्याच्या मित्राला हत्येप्रकरणी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT