PFI संबंधित सहाव्या आरोपीला जळगावातून अटक, ATS ची कारवाई
प्रविण ठाकरे, नाशिक पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजे पीएफआय या संघटनेशी संबधित आणखी एकाला एटीएसनं अटक केली आहे. त्याला जळगाव येथून अटक केला आहे. यापूर्वी महाराष्ट्रातून पाच जणांना अटक केली होती. गेल्या काही दिवसांपासून पीएफआय ही संघटना मोठ्या चर्चेत आली आहे. या संघटनेच्या एकूणचं कार्यपद्धतीमुळं केंद्र सरकारनं या संघटनेवर बंदी आणली आहे. देशभरात या संघटनेशी […]
ADVERTISEMENT
प्रविण ठाकरे, नाशिक
ADVERTISEMENT
पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजे पीएफआय या संघटनेशी संबधित आणखी एकाला एटीएसनं अटक केली आहे. त्याला जळगाव येथून अटक केला आहे. यापूर्वी महाराष्ट्रातून पाच जणांना अटक केली होती. गेल्या काही दिवसांपासून पीएफआय ही संघटना मोठ्या चर्चेत आली आहे. या संघटनेच्या एकूणचं कार्यपद्धतीमुळं केंद्र सरकारनं या संघटनेवर बंदी आणली आहे. देशभरात या संघटनेशी निगडीत लोकांना अटक केली आहे. त्यात राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा आणि एटीएसनं महाराष्ट्रात देखील पीएफआयशी संबधीत काही संशयितांना अटक केली होती. त्यापैकी पाच जणांकडून मोठी माहिती समोर आली होती.
आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी
म्हणून त्यांच्याशी संबधी आणखी काही लोकांच्या मागावर ही यंत्रणा होती. नुकतंच एटीएसनं जळगाव येथून सहाव्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून महत्वाची माहिती समोर आली आहे. उमेर पटेल असं या अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. उमेर पटेल ने याआधी अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईल व इतर डिव्हाईस मधून डेटा नष्ट केल्याचे तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले आहे. कोर्टानं सदर आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याविषयी सरकारी वकील अजय मिसर यांनी माहीती दिली आहे.
हे वाचलं का?
आरोपीच्या वकिलांचा वेगळाच दावा
तर आरोपी पक्षाचे वकील असिफ अली अन्सारी यांनी मात्र वेगळाच आरोप केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार सदर आरोपीने वेळोवेळी चौकशीला सहकार्य केले आहे. त्याला जबाबासाठी बोलावले आणि 4-5 दिवस आधीपासून ताब्यात घेतले असुन तपासाला सहकार्य करत असूनही त्याला काल अटक करून कोर्टात हजर केले आहे, असं आरोपीचे वकील आसिफ अन्सारी यांनी सांगितलं आहे.
यापूर्वी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून पाच जणांना केलं होतं अटक
मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी (26, मालेगाव), अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (48), रझी अहमद खान (31, दोघे रा. कोंढवा, पुणे), वसीम अझीम ऊर्फ मुन्ना शेख (29, रा. बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. कोल्हापूर) अशी या पाच संशयितांची नाव आहेत. नाशिक दहशतवाद विरोधी पथकाने 22 सप्टेंबरला यांना अटक केली होती. न्यायालयाने सुरुवातीस 12 आणि नंतर 5 दिवसांची कोठडी सुनावली होती.
ADVERTISEMENT
तपासादरम्यान या संशयितांकडून संगणक, हार्डडिस्क, मोबाईल जप्त करण्यात आले होते. यात संशयितांचा व्हॉट्सअप ग्रुप आढळून आला असून त्याचा अॅडमिन पाकिस्तानातील असल्याचे उघड झाले. या ग्रुपमध्ये भारतासह, पाकिस्तान, यूएई, अफगाणिस्तान देशांमधीलही सदस्य सहभागी आहेत. ग्रुपमध्ये 175 ते 177 सदस्य होते. यातील काही संशयित परदेशात जाऊन आले असल्याचंही समोर आले. तसेच बँकेचे व्यवहारही तपासण्यात आले.
ADVERTISEMENT
तपासात या गोष्टी समोर आल्यात.
येत्या 2047 पर्यंत भारत मुस्लीम राष्ट्र करणे, राममंदिर पाडून पुन्हा बाबरी मशीद उभारणे.
सिमी या दहशतवादी संघटनेच्या कामकाजानुसार पीएफआयच्या कामाची पद्धत.
संशयितांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले असून, काहींनी परदेशातही वास्तव्य केल्याचे उघड.
केरळमध्ये सर्वाधिक अटक
तपास यंत्रणेने केरळमधून सर्वाधिक 22 जणांना अटक केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकातून 20, आंध्र प्रदेशातून 5, आसाममधून 9, दिल्लीतून 3, मध्य प्रदेशातून 4, पुद्दुचेरीतून 3, तामिळनाडूमधून 10, यूपीमधून 8 आणि राजस्थानमधून 2 जणांना अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, छाप्यादरम्यान अटक करण्यात आली असून, ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT