महाराष्ट्रातल्या Beed आणि Solpaur मध्ये वाढते रूग्ण Corona च्या तिसऱ्या लाटेसाठी पूरक ठरणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूर आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा हाय पॉझिटिव्हिटी रेट आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आरोग्य विभागाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

ADVERTISEMENT

देशातल्या 7 राज्यांमधल्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा रूग्णवाढीचा दर जास्त आहे. केरळमध्ये 7 जिल्हे, मणिपूरमध्ये 5 जिल्हे, मेघालयमध्ये 3 जिल्हे, अरूणाल प्रदेशमध्ये 3 जिल्हे, महाराष्ट्रात 2 जिल्हे, आसाम आणि त्रिपुरामध्ये प्रत्येकी 1 जिल्हा अशा 22 जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णवाढीचा प्रमाण जास्त आहे असंही लव अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. या 22 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातले बीड आणि सोलापूर हे दोन जिल्हे आहेत. तिथला पॉझिटिव्हिटी रेट जास्त असल्याची माहितीही लव अग्रवाल यांनी दिली आहे.

एकीकडे राज्यात तिसऱ्या लाटेची चर्चा होते आहे. तिसरी लाट येऊ शकते या अनुषंगाने महाराष्ट्रात निर्बंध कायम आहे. तिसऱ्या लेव्हलचे निर्बंध राज्यात लागू आहेत. अशात बीड आणि सोलापूरमध्ये वाढते रूग्ण हे तिसऱ्या लाटेला निमंत्रण ठरतात की काय अशी भीती व्यक्त होते आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये प्रमाण वाढलं आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जाते आहे. पहिली लाट ओसरली त्यावेळी पहिल्या लाटेतून बाहेर पडत असतानाच दुसरी लाट कधी आली ते कळलंच नाही. लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असला तरीही उद्धव ठाकरे यांनी रोजी, रोटी सुरू राहिल याचा विचार करून निर्बंध लादले. महाराष्ट्रात 14 एप्रिलपासून निर्बंध लादण्यात आले होते. जे नंतर म्हणजे जूनपासून शिथील करण्यात आले आहेत. आता जुलै महिना संपताना तिसरी लाट ओसरताना दिसते आहे. मात्र आज केंद्रीय मंत्रालयाने दिलेली माहिती पुन्हा चिंतेत भर घालणारी आहे.

हे वाचलं का?

दुसऱ्या लाटेची सुरूवात अमरावतीतून झाली होती. आता तिसऱ्या लाटेला बीड आणि सोलापूरमधून सुरूवात होणार का अशी भीती व्यक्त होते आहे. तरीही शक्य तेवढी सगळी काळजी घेतली जाते आहे. अशात महाराष्ट्रात पुराचं आणि पावसाचंही आस्मानी संकट येऊन उभं आहे. तिसरी लाट येऊच नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र आलीच तर सगळी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे असंही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT